हिंगोली (Narahari Jirwal) : राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार गट) चे नेते नरहरी झिरवाळ यांची हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर आपल्या पक्षाचा नेता असावा यासाठी भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे व शिवसेना आमदार संतोष बांगर हे दोघे प्रयत्नशील होते. ना.मेघना बोर्डीकर यांनाच हिंगोलीचे पालकमंत्री पद मिळेल, अशी चर्चा होती. दरम्यान शनिवारी रात्री नरहरी झिरवाळ (Narahari Jirwal) यांचे नाव जाहीर झाल्याने शिवसेना व भाजप कार्यकर्त्याचा चांगलाच हिरमोड झाला.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील आमदार असलेले नरहरी झिरवाळ (Narahari Jirwal) यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य या दोन विभागाचे मंत्रालय आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या राजकारणावर वसमतचे आमदार राजु भैय्या नवघरे यांची पकड अधिक मजबुत होईल असा अंदाज आहे.