घाटीतील ‘सुपरस्पेशालिटी’चे 5 वर्षांत तिसऱ्यांदा उद्घाटन:अपूर्णतेमुळे शिंदेंनी दिला होता उद्घाटनास नकार, भिंतीला तडे; 25 कोटींची तपासणी यंत्रे सीलबंदच
3 hours ago
3
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) केंद्र आणि राज्य सरकारने १५० कोटी रुपयांच्या निधीतून ५ वर्षांपूर्वी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले. आता त्याच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत. त्याचे उद्घाटन रविवारी (१९ जानेवारी) वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे याच इमारतीत उद्घाटनाची ही तिसरी तर मुश्रीफांच्या हस्तेच उद्घाटनाची दुसरी वेळ आहे. या रुग्णालयासाठी आतापर्यंत १५ कोटी रुपयांची ४०२ यंत्रे खरेदी केली आहेत. यापैकी प्रयोगशाळेतील मशीनसाठी आवश्यक रसायने नसल्याने बंद आहे. नियोजन समिती निधीतून १० कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेली कॅन्सरचे निदान करणारे यंत्र सुरू नाही. नवजात अतिदक्षता विभागात वापरल्या जाणाऱ्या मशीनही सीलबंद पडून आहेत. राज्यात यवतमाळ, लातूर, अकोला आणि संभाजीनगर शहरात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल नियोजित होते. यातील संभाजीनगर येथील घाटीतील इमारतीसाठी केंद्र सरकारने १२० कोटी रुपयांचा निधी इमारतीसाठी दिला होता. राज्य सरकारने ३० कोटी निधी दिला. त्यातून १५ कोटी रुपयांतून मशीन खरेदी झाली. तर १५ कोटी विद्युतीकरण व इतर बाबींवर खर्च केले. या इमारतीचे काम २०१६मध्ये सुरू झाले व २०२०च्या सुमारास पूर्ण झाले. २०२१ दरम्यान कोरोना होता. कोविड संपल्यानंतर बिल्डिंग सुसज्ज झाली होती. ४०२ मशीन उपलब्ध झाल्या आहेत. ‘सुपरस्पेशालिटी’ साठी ४८१ पदे मंजूर आहेत. आज पुन्हा मुश्रीफांच्या हस्ते होणार उद्घाटन या रुग्णालयात कोणते उपचार होणार? पूर्वी कक्षाचे, आज संपूर्ण बिल्डिंगचे उद्घाटन यापूर्वी कॅथलॅबच्या आणि नोंदणी कक्षाचे उद्घाटन झाले होते. सुपरस्पेशालिटीच्या संपूर्ण बिल्डिंगचे आज उद्घाटन होणार. ४०१ मशीन बसवल्या आहेत. एक मशीन बसवण्याचे काम अपूर्ण आहे. तेही लवकरच पूर्ण होईल. - डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, घाटी.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)