बीडची सध्याची परिस्थिती पाहता पालकमंत्रीपदाची जबाबदारी नको असा निर्णय घेतला:अजितदादांनी पद स्वीकारावे अशी विनंती केली- धनंजय मुंडे
3 hours ago
1
वाल्मीक कराड आणि माझे काहीच आर्थिक हितसंबंध नाही. माझ्यावर होणारे हे सर्व आरोप खोटे आहेत. त्यांनी एक तरी आरोप सिद्ध करावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनासाठी शिर्डीत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बीडची स्थाती पाहता मी स्वत: अजित पवार यांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण अजितदादांना जबाबदारी द्यावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. बीडचा विकास व्हावा ही भावना धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले की, बीडचा पुण्यासारखा विकास झाला पाहिजे त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद असल्याने तो जास्तीचा होईल आणि सध्याची परिस्थितीमध्ये मी ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती अजित पवारांना दिली पाहिजे अशी माझीही भावना होती. माझ्यावर एकतरी आरोप सिद्ध करावा धनंजय मुंडे म्हणाले की, माझ्यावर जे आरोप होत आहेत त्यातील एक तरी आरोप त्यांनी सिद्ध करावा. त्यावर मला आता काही बोलायचे नाही. बीडमध्ये सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे होते असे मला वाटते. बीड-परळीला बदनाम करु नका धनंजय मुंडे म्हणाले की, मला बदनाम करायचे आहे किंवा अजून कुणाला बदनाम करायचे आहे ते करा पण माझ्या बीड जिल्ह्याला आणि परळीची बदनामी करु नका, ही विनंती मी करतो. मुंडेंनी केले ट्विट बीड जिल्ह्यात सध्या सुरू असलेली सामाजिक व राजकीय परिस्थिती पाहता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे आपणच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मला न करता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे अशी विनंती केली होती, असेही धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच सद्यस्थितीमध्ये मला कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जाऊ नये, याबाबतही आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना विनंती केली होती, त्यांनी ती मान्य केल्याबद्दल त्यांचे आभारही धनंजय मुंडे यांनी मानले असून, आपल्यावर देण्यात आलेल्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)