बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला असला तरी बीडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडेच राहिलं असून आता बीडचे नवे पालकमंत्री हे आता अजित पवार असणार आहेत.
राज्यातील पालकमंत्र्याची नुकतीच यादी जाहीर करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्रीपदं कधी जाहीर होणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले होते. अशातच बीड जिल्ह्यातील पालकमंत्रीपद धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडे जाणार की नाही? यावर चर्चा सुरू असताना बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना देण्यात आलं नसल्याचे पाहायला मिळाले. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला असला तरी बीडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडेच राहिलं असून आता बीडचे नवे पालकमंत्री हे आता अजित पवार असणार आहेत. तर बीडचं पालकत्व अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर भाजप बीडच्या आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘बीडचे पालकमंत्रीपद अजितदादांना मिळावं ही आमची मागणी होती’, असं सुरेश धस म्हणाले. तर सुरेश धस यांनी बीडचे पालकमंत्री अजित पवार झाल्यानंतर त्यांनी दादांचे अभिनंदन केल्याचेही पाहायला मिळाले. पुढे ते असेही म्हणाले, ‘अजित पवार यांना संपूर्ण राज्य आणि बीड जिल्हा माहिती आहे. ते अतिशय योग्य काम करू शकतील. यासह बीड जिल्ह्यातील सहा पैकी चार आमदारांची अजित पवार बीडचे पालकमंत्री व्हावे, अशी इच्छा होती’, असेही सुरेश धस म्हणाले.
Published on: Jan 19, 2025 01:35 PM