Published on
:
19 Jan 2025, 11:24 am
Updated on
:
19 Jan 2025, 11:24 am
पुढारी ऑनलाइन डेस्क : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात आज सुमारे १९ तंबूंना आग लागली. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत,स्थानिक अधिकाऱ्यांनी, पोलिस आणि अग्निशमन दलांसह आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत असे वृत्त ANIने दिले आहे.
एका तंबूतला आग लागली. परिसरात अनेक तंबूंना आगीनेवेढले. आग विझवण्यासाठी अग्निशमन अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) ची एक टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे.