डॉक्टरांवर आरोप, विरली बूज. येथील घटना
मासळ/भंडारा (Health Crime) : गेल्या वीस दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या मेघाचा अखेर मृत्यू झाला असून दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याचा मागणीला घेऊन संतप्त कुटुंबियांसोबत ग्रामस्थांनी मृतदेह (Dead body) मुख्य रस्त्यावरच ठेऊन रस्ता अडविला आणि (Villagers Protest) ठिय्या आंदोलन सुरू केला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली बूज येथे घडली असून मेघा आकाश बनारसे, असे मृत महिलेचे नाव आहे. सध्या शेकडो महिला-पुरुषांनी रास्ता रोको सुरू केला असून लाखांदूर पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
मेघा बनारासे या महिलेची सरांडी बूज. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दि.१६ नोव्हेंबर रोजी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर प्रकृती अस्वस्थ (Dead body) असल्यामुळे तिला सराडी बूज येथील डॉक्टरांनी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. मात्र मेघा बनारसे यांच्या कुटुंबियांनी सरकारी दवाखान्यात न नेता खासगी दवाखान्यात भरती केले. तेथील डॉक्टरांनी दि.१९ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करून काही दिवसांनी दवाखान्यातून सुट्टी दिली. तपासणीसाठी सतत भंडारा येथे गेल्यावर पुन्हा मेघाची प्रकृती खालावल्याने तिला परत ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले.
तेथे दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आल्यावरही मेघाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर तिला दि.१८ जानेवारी २०२५ रोजी नागपूर येथील मेडिकल मध्ये भरती करण्यात आले. त्यात काही तासातच मेघाची मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या संपूर्ण घटनेतील दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीला घेऊन दि.१९ जानेवारी रोजी मेघाचा मृतदेह (Dead body) विरली बूज येथे आणताच चौकात भर रस्त्यावर मृतदेह ठेऊन नागरिकांनी (Villagers Protest) ठिय्या आंदोलन सुरू केला आहे. सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली असून प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.