सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारी रोजी मध्यरात्री चोरट्याने हल्ला केला. चार दिवसानंतर आज भल्या पहाटे हल्लेखोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तो बांगलादेशी असल्याची पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे त्याचे नाव आहे. दरम्यान अभिनेता शत्रुघ्न सिन्हा हे सैफ अली खान याच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. त्यांनी समाज माध्यमावर याविषयीची प्रतिक्रिया दिली. पण ते करताना त्यांच्याकडून एक चूक झाली. त्यावर युझर्सनी ही चूक त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी चूक दुरुस्त केली.
शत्रुघ्न सिन्हा यांनी मांडले मत
शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्वीट केले, “ आमचा अगदी जवळचा आणि लाडका सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात तो जखमी झाल्याचे दु:ख आहे. ही घटना दुर्दैवी आहे. देवाच्या कृपेने हे संकट टळले आहे. माझे आतापर्यंतचे सर्वात आवडते शो मॅन फिल्म निर्माता राज कपूर यांची नात करीना कपूर खान आणि कुटुंबाला देव शक्ती देवो. याप्रकरणी आरोप-प्रत्यारोप करणाऱ्यांनी हा खेळ थांबवावा ही विनंती. पोलीस चांगले काम करत आहे.”
हे सुद्धा वाचा
Get Well Soon
शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या ट्वीटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले. सैफ अली खान हा एक चांगला कलाकार आहे. त्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. तो राष्ट्रीय पुरस्कार विजेता आहे. कायदा त्याचे काम करेल. प्रत्येक गोष्टी योग्य होतील, सैफ तू लवकर बरा हो, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
शत्रुघ्न सिन्हाकडून झाली ही चूक?
तुम्हाला वाटलं असेल यामध्ये तर काहीच चूक दिसत नाही. तर शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून मजकूरात कोणतीच चूक केली नाही. त्यांनी ट्वीट करताना एक फोटो शेअर केला. त्यावरून खरी गडबड झाली. कारण त्यांनी जे चित्र वापरले ते कृत्रिम बुद्धिमतेच्चा AI वापर करून तयार करण्यात आले होते. त्यावर मग युझर्सच्या कमेंटचा पाऊस पडला. त्यांनी हे चित्र खरं नसल्याचे आणि एआयच्या मदतीने तयार केल्याची माहिती दिली. ही चूक लक्षात येताच शत्रुघ्न सिन्हा यांनी एआय छायाचित्र न वापरता तीच पोस्ट शेअर केली आणि पहिले ट्वीट डिलिट केले.