NCP Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार यश मिळाले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी सुरु केली आहे. पक्षाच्या समारोप शिबिरात बोलताना अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरु केली. त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना काननंत्र दिला. पक्षाच्या वाढीसाठी झपाट्याने काम करण्याचा सल्ला दिला.
असे तयार करा मतदार
आगामी काळात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यासंदर्भातील तयारी बोलताना अजित पवार म्हणाले, कुणाला पदासाठी इच्छुक असेल तर इच्छुकांनी एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे. त्या कार्यकर्त्यावर २५ घरांची जबाबदारी दिली पाहिजे. प्रत्येक घराची सरासरी चार मते लक्षात घेतल्यावर १०० मतदार मिळतील. यंदा महापालिका चारचा प्रभाग राहणार आहेत. नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका वॉर्ड वाईज होतील. महापालिकेसाठी चारचा प्रभाग राहील.
२० हजार मते होणार
अजित पवार यांनी मनपा निवडणुकीतील प्रभाग रचनेत कसे बदल होते गेले, ते सांगताना सांगितले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे म्हणाले होते चार प्रभाग असावे. त्यावेळी काहींनी दोनचा मुद्दा मांडला. तर उद्धव ठाकरे म्हणाले, दोन राहू द्या, चार राहू द्या. तीनच करा. मग तीनच प्रभाग केले होते. त्यानंतर समीकरणे बदलली. एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार आले. त्यांनी चारच प्रभाग केले. त्यामुळे आता तेच राहणार आहे. आता प्रभागात प्रत्येक उमेदवाराने ५०-५० कार्यकर्ते तयार केले आणि २०० लोक होतील. प्रत्येक प्रभागात दोनशे लोक होतील. असे मिळून आपले २० हजार मते होतील, असे सूत्र अजित पवार यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
शिर्डीत राष्ट्रवादी पक्षाचे दोन दिवशीय अधिवेशन होते. त्या अधिवेशनात समारोप प्रसंगी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत निवडणुकीच्या तयारीचे रणशिंग फुंकले. यावेळी त्यांनी निवडणुकीसाठी कशी तयारी करावी, त्यावर मार्गदर्शन केले.