विधानसभा निवडणुकीत सहानुभूति मिळविण्याच्या उद्देशाने हल्ल्याचा बनाव
हिंगोली (Shri Guru Padeshwar Maharaj) : वसमत तालुक्यातील गिरगाव मठाचे मठाधिपती श्री गुरू पादेश्वर महाराजांच्या वाहनावर विधानसभा निवडणुक कालावधीत दगडफेक करून त्यांना जखमी केल्या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याचा सखोल तपास केल्यावर हल्लेखोरांना अटक करण्यात आली.
वसमत विधानसभा मतदार संघाच्या (Assembly elections) निवडणुकीत गिरगाव मठाचे मठाधिपती श्री गुरूपादेश्वर महाराज (Shri Guru Padeshwar Maharaj) हे जनसुराज्य पक्षातर्फे निवडणुकीला उभे होते. निवडणुक रंगात सुरू असताना श्री गुरू पादेश्वर महाराजांच्या वाहनावर अनोळखी अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करून त्यांना जखमी केल्याबाबत १९ नोव्हेंबर २०२४ रोजी (Wasmat Rural Police) वसमत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्याकडे वर्ग केला होता. गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक नियुक्त करून पथकाने घटनास्थळावरील पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षिदार, गोपनीय बातमीदार व तांत्रिक बाबींचा अभ्यास बारकाईने केला.
ज्यामध्ये श्री गुरू पादेश्वर महाराजांच्या (Shri Guru Padeshwar Maharaj) वाहनावर दगडफेक केल्या प्रकरणी भुजंग माधवराव निरदुडे, संकेत भास्कर भोसले रा. शिवराई नगर मालेगाव रोड नांदेड यांना ताब्यात घेऊन कसुन चौकशी केली असता श्री गुरू पादेश्वर महाराज हे विधानसभा निवडणुकीस उभे राहिल्यामुळे त्यांना मतदारांची सहानुभूती मिळावी, या उद्देशाने त्यांच्या ओळखीतील स्वामी रा. नांदेड यांच्या सांगण्यावरून श्री गुरू पादेश्वर महाराजांच्या Shri (Guru Padeshwar Maharaj) वाहनावर गिरगाव पाटी रस्त्यावर दगडफेक करून वाहन फोडल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का? या बाबत पथक तपास करीत आहे.
ही (Wasmat Rural Police) कामगिरी पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुभोणे, कपिल आगलावे, प्रेमदास चव्हाण, गजानन पोकळे, कुमार मगरे, राजू ठाकुर, लिंबाजी वाव्हळे, रविकुमार स्वामी, निरंजन नलवार, आकाश टापरे, हरिभाऊ गुंजकर, नरेंद्र साळवे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, विठ्ठल काळे, इरफान पठाण, प्रदिप झुंगरे यांनी केली आहे.