Saif Ali Khan Bangladesh Citizen Mohammad Aliyan : बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचाराच्या घटना घडत असतानाच, भारतात येऊनही हे नागरीक हैदोस घालत असल्याचे अनेक घटनांमधून उघड झाले आहे. त्यांच्या आश्रयदात्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
बांगलादेशातून भारतात येतात कसे घुसखोर?
बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. तिथल्या तख्ता पलटनंतर कट्टरतावाद्यांनी अल्पसंख्यांकाना टार्गेट केले आहे. तर दुसरीकडे बांगलादेशी घुसखोरांनी सुद्धा देशात हैदोस घातला आहे. अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्या प्रकरणातील आरोपी थेट बांगलादेशी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने बांगलादेशींवर कारवाईची मागणी वाढली आहे. त्यांच्या आश्रयदात्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
बांगलादेशातून थेट मुंबईत
सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफउल इस्लाम शेहजाद आहे. तो बांगलादेशातील झलोकाठी या जिल्ह्यातील राजाबरीया येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. तो 30 वर्षांचा आहे. त्याने भारतात घुसखोरी केली आहे. सुरुवातीला पश्चिम बंगाल आणि नंतर त्याने थेट मुंबई गाठली.
हे सुद्धा वाचा
भारतात आल्यानंतर तो ठाण्यात एका हॉटेलमध्ये हाऊसकिपिगचं काम करत होता. त्यानंतर कन्स्ट्रक्शन साईटवरही काही दिवस काम केल्याचे तपासात समोर आले. पाच ते सहा महिन्यांपूर्वी तो मुंबईत आला होता. हा अनेक महिन्यांपासून बेरोजगार होता. चोरीच्या उद्देशाने तो सैफच्या घरात शिरला मात्र ते सैफअली खानचं घर होतं हे त्याला माहित नव्हतं, असे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
तपास यंत्रणा लागल्या कामाला
आरोपीला भारतात वास्तव्यास असताना कोणी मदत केली याची आता चौकशी होणार आहे. हाउसकिपिंग एजन्सीत त्याला काम कसे मिळाले हेसुद्धा मुंबई पोलीस तपासणार आहेत. बांगलादेशी नागरिकांना भारतात वास्तव्यास मदत करणारे अनेक एजंट असतात या प्रकरणात आरोपीला कोणी मदत केली याची चौकशी होणार आहे. हाऊसकिपिंग एजन्सीत काम करताना आवश्यक असणारी भारतीय कागदपत्रे आरोपीकडे होती का आणि नसतील तर त्याला काम कसे मिळाले याची चौकशी होणार आहे.