दापोली : पर्यटनासाठी आलेले पर्यटक दापोली-मंडणगड मार्गावर भर रहदारीत मद्य पिताना.pudhari photo
Published on
:
19 Jan 2025, 1:25 am
Updated on
:
19 Jan 2025, 1:25 am
दापोली : पर्यटनचे माहेरघर असणारा दापोली तालुका आता दारूचे माहेरघर होत आहे का? असा प्रत्यय आता दापोलीत नागरिकांना येत आहे. दापोली शहरात भर रहदारीच्या ठिकाणी पर्यटनासाठी येणारे पर्यटक हे दारूचा घोट घेत आहेत. या बाबत आता स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. सरत्या वर्षाला निरोपदेताना अशा वेळी मद्यपींवर नजर असते. मात्र, अन्य वेळी अशा मद्यपींचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
दापोली तालुक्याला लाभलेला समुद्रकिनारा, येथील प्रेक्षणीय स्थळे, गरम पाणी कुंड, प्राचीन लेणी, कड्यावरचा गणपती अशी पर्वणी लाभली आहे. मात्र, काही मोजके पर्यटक सोडल्यास बहुतांशी पर्यटक हे दारूच्या अधीन गेलेले दिसतात. त्यामुळे अनेकवेळा पर्यटन क्षेत्रात वादाचे, पर्यायी मारहाणीचे प्रसंग घडतात. अनेक वेळा मद्यपी वाहन चालकांमुळे अपघात होत आहेत.
नवीन 2025 या वर्षात पर्यटन क्षेत्रात तीन ते चार अपघात झाले आहेत. यात निरपराध लोकांचे नुकसान होत आहे. आजही दापोलीत दारू पिऊन पर्यटक वाहने चालवत आहेत. शहरात शाळा, कॉलेज, कोकण कृषी विद्यापीठ या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे अशा मद्यपी वाहन चालकांना चाप बसावा, अशी मागणी होत आहे.