बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत मोठमोठे खुलासे केले आहेत. १६ जानेवारी २०२५ रोजी वांद्रे पोलीस स्टेशनच्या हद्दीत अभिनेता सैफ अली खानवर यांच्या घरी जबरी चोरी आणि हल्ल्याची जी घटना झाली, त्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. […]
saif ali khan impeach apprehension constabulary pc
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत मोठमोठे खुलासे केले आहेत.
१६ जानेवारी २०२५ रोजी वांद्रे पोलीस स्टेशनच्या हद्दीत अभिनेता सैफ अली खानवर यांच्या घरी जबरी चोरी आणि हल्ल्याची जी घटना झाली, त्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे आहे. त्याचे वय ३० वर्ष असे आहे. हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न होत आहे. या आरोपीला न्यायलयात दाखल करुन त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहोत. यानंतर पुढील चौकशी करणार आहोत.
या आरोपीला आम्ही अटक केल्यानंतर त्याची उत्तर आणि त्याच्याकडे जे काही साहित्य मिळालेले आहे, त्या अनुषंगाने प्रथम दर्शनी असे वाटतंय की तो बांगलादेशी नागरिक आहे. सध्या आम्ही याचा पुढील तपास करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.