सैफ अली खानवर झालेल्या हल्लाप्रकरणात पोलिसांनी आरोपीला ठाण्यात अटक केली आहे. ठाण्यातील हिरानंदनीमधल्या लेबर कॅम्पमधून आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी विजय दास वेशांतर करुन ठाण्यात गेला होता. हिरानंदनी परिसरात तो कामगारांसोबत लपला होता. दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून सकाळी 9 वाजता मुंबई पोलीसांची पत्रकार परिषद होणार आहे.
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार आरोपी विजय दास, बिजॉय दास आणि मोहम्मद इलियाज अश्या तीन नावांचा वापर करुन आरोपी वावरत होता.