पुणे (Guillain Barre Syndrome) : चीनमधून येणाऱ्या ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस (HMPV) मुळे भारतात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने विषाणूबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. वेगवेगळ्या ठिकाणांहून संक्रमित रुग्ण आढळू लागले आहेत. दरम्यान, पुण्यात एका दुर्मिळ (Guillain Barre Syndrome) सिंड्रोमने थैमान घातले आहे.
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे 22 संशयित रुग्ण आढळल्यानंतर लोक हैराण झाले आहेत. हा एक असा आजार आहे, ज्यामुळे अचानक अशक्तपणा येतो, सुन्नपणा येतो आणि शरीरातील स्नायूंच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. या (Guillain Barre Syndrome) संक्रमणाने (Health Department) आरोग्य विभाग सावध झाले असून, तज्ञांचे एक पथक सतत त्यावर लक्ष ठेवून आहे.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम म्हणजे काय?
गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ मज्जासंस्थेचा विकार आहे, ज्यामध्ये रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. यामुळे हात-पाय सुन्न होतात आणि स्नायू कमकुवत होतात. हा आजार इतका गंभीर असू शकतो की, (Guillain Barre Syndrome) रुग्णाला चालण्यास किंवा श्वास घेण्यासही त्रास होऊ लागतो.
पुण्यातील जीबीएस प्रकरणे:
- पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानुसार, बहुतेक रुग्ण 12ते 30 वयोगटातील
- 59 वर्षीय रुग्णावरही उपचार सुरू
- हे रुग्ण प्रामुख्याने सिंहगड रोड परिसरात आढळून आले
- बाधित लोकांचे नमुने चाचणीसाठी ICMR-NIV येथे पाठवले
जीबीएस एक महामारी बनणार?
पुण्याच्या नागरी (Health Department) आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे म्हणाल्या की, जीबीएस बद्दल घाबरून जाण्याची गरज नाही. हा आजार महामारीचे रूप धारण करत नाही. हे संसर्गाशी संबंधित आहे, विशेषतः जेव्हा एखादा जीवाणू किंवा (Guillain Barre Syndrome) विषाणू रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो. योग्य उपचारांनी बहुतेक रुग्ण बरे होतात. हा आजार मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये देखील होऊ शकतो.
गिलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे?
- जीबीएसची लक्षणे सौम्य ते गंभीर
- अशक्तपणा आणि सुन्नपणा (विशेषतः हात आणि पायांमध्ये)
- डोळे आणि स्नायूंमध्ये अडचण (दृष्टी समस्या)
- बोलण्यात, चावण्यात किंवा गिळण्यात समस्या
- सुईसारखी वेदना किंवा जळजळ
- रात्रीच्या वेळी वेदना अधिक तीव्र
- चालण्यात अस्थिरता, समन्वयाच्या समस्या
- असामान्य हृदय गती किंवा रक्तदाबात बदल
- पचन किंवा मूत्राशय नियंत्रणात समस्या
जीबीएसचा संसर्ग कशामुळे?
जीबीएस (Guillain Barre Syndrome) सामान्यतः विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गानंतर होतो. जेव्हा शरीर संसर्गाशी लढण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते चुकून नसांवर हल्ला करते. यामुळे शरीराच्या काही भागांमध्ये अशक्तपणा आणि सुन्नपणा येतो.