जळगावच्या नशिराबाद येथील एका कीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमाला शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे हजर होते. यावेळी त्यांनी हिंदू धर्मावर भाष्य करत मला माझ्या धर्माचा अभिमान आणि गर्व असल्याचेही विधान केले आहे.
सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. तर जो धर्माच्या विरोधात त्याचे काही खरं नाही, असंही गुलाबराव पाटील म्हणाले. ‘धर्मकार्य आणि भगवा झेंडा याच्यावर कायम एकनिष्ठ राहणं आणि एकजूट राहणं ही काळाची गरज आहे’. असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या नशिराबाद येथील एका कीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमात केलं आहे. आपण कुठल्या जातीचे आहोत यापेक्षा हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल. हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कशी टिकेल, धर्मावर बोलत असताना या भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होवू शकलो याचा मला अभिमान आहे, असं गुलाबवार पाटील म्हणाले. आपण निवडणूक पाहिली, भगवे एका बाजूला होते आणि बाकी सर्व एका बाजूला होते. मंत्री जरी असलो तरी पहिले मी हिंदू आहे. त्यामुळे मला माझ्या धर्माचा अभिमान आणि गर्व असल्याचेही विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. बघा काय म्हणाले गुलाबराव पाटील?
Published on: Feb 02, 2025 12:56 PM