हिंदू धर्मात रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे. या सप्तमीला माघ सप्तमी असेही म्हणतात कारण ती माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला साजरी केले जाते. या दिवशी भक्त सूर्य देवाला अर्घ्य देतात आणि त्यांची पूजा करतात. हिंदू धर्मातील सर्व सप्तमी मध्ये रथसप्तमी ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेव अवतरले होते. या दिवशी सूर्य देवाची आराधना केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व वाईट गोष्टी दूर होतात.
कधी आहे रथसप्तमी? माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी सोमवारी 4 फेब्रुवारी रोजी पहाटे 4.37 मिनिटांनी सुरू होईल आणि 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 संपेल. उदय तिथीनुसार 4 फेब्रुवारीला रथसप्तमीचा सण साजरा केला जाणार आहे.
रथसप्तमी शुभ मुहूर्त पंचांगानुसार रथसप्तमीच्या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त पहाटे 5: 23 ते 7: 08 पर्यंत असेल. यावेळी स्नान करू शकतात आणि प्रार्थना करू शकतात. तसेच याच वेळेत सूर्यदेवाची पूजा करायची आहे.
पूजा विधि रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर तांब्याचा कलश पाण्याने भरून हळूहळू दोन्ही हातांनी सूर्याला अर्घ्य द्या. यावेळी सूर्याच्या मंत्राचा जप करा. अर्घ्य दिल्यानंतर तुपाचा दिवा लावून सूर्य देवाची पूजा करा. पूजेमध्ये लाल रंगाची फुले, उदबत्ती आणि कापुराचा वापर आवश्यक करा. असे म्हणतात की यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि यशाचे नवीन मार्ग सापडतात.
सूर्य मंत्र आणि ग्रंथाचे पठण ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ।
ॐ सूर्याय नम: ।
ॐ घृणि सूर्याय नम: ।
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।।
ऊँ आदित्याय विदमहे प्रभाकराय धीमहितन्न: सूर्य प्रचोदयात्।।
ऊँ सप्ततुरंगाय विद्महे सहस्त्रकिरणाय धीमहि तन्नो रवि: प्रचोदयात्।।
गायत्री मंत्र
सूर्य सहस्रनाम
आदित्यहृदयम्
सूर्याष्टकम
रथसप्तमीचे महत्व रथसप्तमीला सूर्याची पूजा केल्याने शाश्वत फळ मिळते. तसेच सूर्यदेव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देतात. या दिवशी सूर्याकडे पाहून सूर्याची स्तुती केल्याने त्वचारोग दूर होतात आणि दृष्टी सुधारते. हे व्रत भक्ती आणि श्रद्धेने केल्याने पिता-पुत्रांमध्ये प्रेम टिकून राहते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)