वनविभागाचे ठेकेदाराशी साटेलोटे!
मानोरा (Manora) : तालुक्यातील कार्ली परीसरात आडजात वृक्षतोडीला उधाण आले असुन याकडे वन विभागाचे अधिकारी (Forest Department Officer) व कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. या गंभीर बाबीची वरीष्ठ अधिकाऱ्यांनी (Senior Officer) दखल घेत आळा घालावा, अशी मागणी पर्यावरण (Environment) प्रेमीकडून होत आहे. सविस्तर असे की, कार्ली शेत शिवार परीसरात मागील काही दिवसापासून आडजात आंबे, बाभूळ व इतर झाडांची आरीने वृक्षाची कत्तल (Tree Cutting) करणारी टोळी सक्रीय झाली आहे. काही ठिकाणी वन विभागाची परवानगी तर अनेक ठिकाणी परवानगी न घेताच जिवंत झाडांची आरीने कटाई करत वाहनात लाकूड (Wood) भरून दारव्हा व कारंजा कडे नेताना तस्कर दिसून येत आहे. सदर सूरु असलेला प्रकाराकडे वन विभागाचे वनपाल, वन रक्षक यांच्यासह अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली आहे. वरिष्ठांनी सदर प्रकाराची दखल घेऊन झाडांची कत्तल थांबवावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमी कडून होत आहे.
शासन (Government) एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देवून प्रत्येकानी एक झाड लावावा, असा उपदेश देतात आणि दुसरीकडे वन विभाग लाकूड तस्कराला वृक्ष तोड करण्याचा मुभा देतात. तसेच अनेक ठिकाणी लाकूड तस्कर परवानगी शिवाय झाडांची आरीने कत्तल करतात.