हिंगोली (Hingoli decease Case) : राहोली खु. फाट्या समोर ३१ जानेवारी ला ऑटोतून खाली पडलेल्या विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी चालकावर हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला. हिंगोलीतील रोहीत श्रीवास याने ३१ जानेवारीला तिनचाकी ऑटो रिक्षा क्रमांक एमएच ३८ डब्ल्यू ०५९५ ही भरधाव वेगात व निष्काळजीपणे व वेडीवाकडी चालविल्याने ऑटोत बसलेल्या तिघीपैकी अंजना तुकाराम कर्हाळे रा. पार्डी मोड ता. कळमनुरी या विद्यार्थिनीचा झोक जाऊन ऑटोतून खाली पडत असताना अंजना व मायावती या (Hingoli decease Case) दोन्ही विद्यार्थिनीने तिला पकडण्याचा प्रयत्न केला.
परंतु अंजनाचा झोक गेल्याने तिघी सुध्दा ऑटोतून रस्त्यावर खाली पडल्याने अंजना कर्हाळे ही गंभीररित्या जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. तर सोबतची मायावती व पुजा या दोघीही जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. १ फेब्रुवारी रोजी पुजा पांढरे हिने पोलिसांना दिलेल्या जवाबावरून ऑटो चालक रोहीत श्रीवास याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या (Hingoli decease Case) प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे ह्या करीत आहेत.