ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांच्या जन्मशताब्दी सोहळा व हॉटेल शांतीच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन
हिंगोली (MP Sharad Chandra Pawar) : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांच्या जन्मशताब्दी सोहळा व हॉटेल शांतीच्या उद्घाटन निमित्त खा. शरदचंद्र पवार (MP Sharad Chandra Pawar) हे २५ फेब्रुवारी मंगळवार रोजी हिंगोलीत येणार असुन त्यांच्या उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता स्वा. से. माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांचा जन्मशताब्दी सोहळा व हॉटेल शांतीचा उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (MP Sharad Chandra Pawar) पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिली.
यापूर्वी २७ जानेवारीला खा. शरदचंद्र पवार हे हिंगोलीत येणार होते. परंतु त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने हिंगोलीतील पुर्वनियोजित दौरा लांबनीवर गेला होता. यानिमित्त माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, राकॉ जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, अवधूत निळकंठे यांनी खा. शरचदचंद्र पवार (MP Sharad Chandra Pawar) यांची मुंबईत भेट घेतली असता २५ फेब्रुवारी रोजी हिंगोलीला येण्याकरीता खा. शरदचंद्र पवार यांनी सहमती दर्शविली. त्याच प्रमाणे खा. शरदचंद्र पवार हे नर्सी ना. येथे संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (MP Sharad Chandra Pawar) पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिली आहे.