बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या फिल्मी आयुष्यापेक्षाही त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जास्त चर्चा होताना दिसते. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात.
एवढंच नाही तर त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टींसाठी आवाज उठवल्याचेही अनेक किस्से ऐकायला मिळतात. अशीच एक अभिनेत्री तिच्या सौंदऱ्यामुळे, तिच्या अभिनयासाठी आणि मुख्य म्हणजे तिच्या बेधडकपणासाठी ओळखली जाते.
तिच्या डिंपल स्माईलवर चाहते फिदा
या अभिनेत्रीने चक्क अंडरवर्ल्डचा डॉनसोबत पंगा घेतला होता. तेही कशाचीही पर्वा न करता, न घाबरता. तेव्हापासून तर ही अभिनेत्री अजूनच चर्चेत आली आहे. 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ही अभिनेत्री जिच्या सौंदऱ्यावर आणि ती तिच्या डिंपल स्माईलवर चाहते फिदा होतात. ती अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीती झिंटा.
34 मुलींना दत्तक घेतलं
प्रीतीचे करिअर जेवढे यशस्वी होते त्यापेक्षा जास्त तिचे खासगी आयुष्य थोडं संघर्षमय राहिलं आहे. तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर फक्त बॉलिवूडमध्येच नाव कमावलं असं नाही तर तिने समाजातही तेवढंच नाव कमावलं आहे तेही तिच्या काही धाडसी निर्णयांमुळे. त्यातील एक धाडसी निर्णय म्हणजे प्रीतीने 2009 मध्ये 34 मुलींना दत्तक घेतलं. आजपर्यंत त्या मुलींच्या संगोपनाचा सर्व खर्च ती स्वतः उचलत आहे.
सामाजिक कार्यात तिने खूप महत्त्वाचा सहभाग नोंदवला आहे. एकदा तिने बलात्कारासारखे गुन्हे करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा अशी मागणी लावून धरली होती. तिने थेट त्यांना नपुंसक बनवण्याची मागणी केली होती.तेव्हाही ती फार चर्चेत आली होती.
अंडरवर्ल्ड डॉनशी पंगा
एवढच नाही तर प्रीती चक्क बेधडकपणे एका अंडरवर्ल्डच्या डॉनला नडली होती. ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटात अंडरवर्ल्डच्या माणसांचे पैसे गुंतल्याचं म्हटलं जात होतं. परंतु हे चित्रपटाच्या टीमला आधी माहिती नव्हतं. जेव्हा ही गोष्ट उघड झाली, तेव्हा प्रीतीसह संपूर्ण टीमला धमक्या दिल्या जाऊ लागल्या. या सगळ्या दबावाखाली सगळ्यांनी माघार घेतली. पण प्रीती झिंटा एकटीच अशी होती जिने अंडरवर्ल्डविरोधात कोर्टात साक्ष दिली.
छोटा शकीलविरुद्ध तिने कोर्टात साक्ष दिली होती. या अपार धाडसासाठी तिला त्यावेळच्या गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते ‘गॉडफ्रे फिलिप्स नॅशनल ब्रेवरी अवॉर्ड’ने सन्मानितही करण्यात आलं होतं. तसेच तिचे सर्वत्र कौतुकही झालं होतं.
दरम्यान प्रीतीचा पहिला चित्रपट शाहरुख खानसोबतचा ‘दिल से’ होता. या चित्रपटानंतर ती हळूहळू प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. ‘क्या कहना’, ‘कोई मिल गया’, ‘वीर-ज़ारा’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांनी तिने चाहत्यांची मने जिंकली.
600 कोटींची ऑफर नाकारली
खासगी आयुष्यातही प्रीतीने अनेक मोठे निर्णय घेतले होते. प्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोही यांचे पुत्र शानदार अमरोही प्रीतीला मुलीप्रमाणे मानत होते. त्यांनी प्रीतीला त्यांच्या 600 कोटी रुपयांच्या संपत्तिची ऑफर दिली होती. मात्र प्रीतीने ती संपत्ती स्वीकारण्यास नकार दिला. आज प्रीती स्वतः 183 कोटी रुपयांची मालकीण आहे.यातून तिने तिचा प्रामाणिकपणाही सर्वांना पाहायला मिळाला होता.