आंध्र प्रदेशातून सदर मुलाला ताब्यात घेतले…
परभणी (Parbhani) : प्लॉट नावावर करुन द्या, असे म्हणत लोखंडी सब्बल डोक्यात मारुन मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना चुडावा पोलीस ठाणे हद्दितील कलमुला येथे घडली होती. घटनेनंतर मुलगा पसार झाला होता. चुडावा पोलिसांनी आंध्र प्रदेशातून (Andhra Pradesh) सदर मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याला पुढील तपासासाठी चुडावा पोलीस ठाण्यात (Chudawa Police Station) हजर करण्यात आले आहे.
वडिलांचा खून करुन शेख अकबर शेख अमीन हा पसार झाला होता. आरोपीचा परभणीसह शेजारील जिल्ह्यात शोध घेण्यात आला. मात्र आरोपी मिळाला नाही. आरोपी हा आंध्रप्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर चुडावा पोलिसांचे पथक निजामाबाद जिल्ह्यातील श्रीकोंडा पोलीस स्टेशन (Srikonda Police Station) हद्दितील चिमनपल्ली या गावात गेले. आरोपी शेख अकबर याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन चुडावा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ही कारवाई सपोनि. नरसिंग पोमनाळकर, पोउपनि. मुखेडकर, पोलीस अंमलदार राजेश्वर आईटवार, विलास मिटके यांच्या पथकाने केली.
आरोपीला पोलीस कोठडी!
चुडावा पोलिसांच्या पथकाने आरोपी शेख अकबर याला ताब्यात घेत न्यायालया समोर हजर केले. न्यायालयाने आरोपीस 4 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्लॉट नावावर करुन देण्याच्या वादात आरोपी (Accused) मुलाने लोखंडी सब्बल डोक्यात मारुन वडिलांचा खून केला होता.