घटना कळताच पोलिस अधिक्षकांनी घटनास्थळी दिली भेट…!
पालम (Palam) : शहरातील गंगाखेड रोडवरील शिवनेरी कॉलेज जवळ असलेले एसबीआयचे एटीएम मशीन (SBI ATM Machine) अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या (Gas Cutter) साह्याने तोडून आतील रक्कम लंपास केली आहे. या घटनेने पालम शहरात खळबळ माजली आहे. या घटनेचे वृत्त कळताच पालम पोलीस स्टेशनचे पोनि. सुरेश थोरात आपल्या सर्व टीम सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठांना याबाबतीत कळविली. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे (Superintendent of Police Yashwant Kale) व उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील, स्थागुशाचे पोनि. विवेकानंद पाटील यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेच्या अनुषंगाने योग्य तो तपास करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकार्यांनी दिल्या.
परभणीतील पालम पोलिस घेत आहेत चोरट्यांचा शोध…
दरम्यान, सदरील एटीएम फोडण्या अगोदर चोरट्यांनी प्रवेशद्वारा जवळील सीसीटीव्ही कॅमेर्यावर (CCTV Camera) काळ्या कलरचा स्प्रे मारल्याचे निदर्शनात आढळून आले. घटनेच्या एक दिवस अगोदर एटीएममध्ये 25 लाख रुपयांची कॅश भरण्यात आली होती अशी माहिती बँकेच्या कर्मचार्यांकडून (Bank Employee) देण्यात आली. परंतु चोरट्यांनी किती रकमेवर डल्ला मारला याची पूर्ण माहिती मिळू शकली नाही, याचा तपास चालू आहे.या प्रकरणी वृत्तलिहीपर्यंत पालम पोलीस स्टेशन (Palam Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती