बीडमधईल मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून अद्याप एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक आणि जनतेने लावून धरली आहे. यातच भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. त्यायानंतर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी नामदेवशास्त्री यांना सर्व पुरावे दिले आहेत. त्यावर देशमुख कुंटुबीयांच्या पाठिशी भगवान गड नेहमीच असेल, असे आश्वासन नामदेव शास्त्री यांनी दिले आहे. तसेच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने आपल्या भआवना व्यक्त केल्या आहेत.
जे आरोपी आले होते, ते खंडणी मागण्यासाठी आले होते. त्यांनी आमच्या दलित बांधवांना हाणमार केली, म्हणून माझे वडील अडवण्यासाठी गेले होते. मात्र, माझ्या वडिलांनाच माराहण करण्यात आली. त्यांना फक्त ही मारहाण वाटते. मात्र, माझ्या वडिलांवर किती वार झाले आहेत. ते वार त्यांना का दिसले नाहीत, असा सवाल संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांना केला.
माझ्या वडिलांवर किती वार झालेले आहेत. रक्त सांगाळलेले आहे. माझ्या वडिलांवर किती घाव झाले, ते त्यांना दिसले नाहीत का, त्यांच्यावर किती घाव झाले, ते त्यांना का दिसले नाहीत, अशी विचारणा वैभवी देखमुख यांनी केली. तसेच न्यायाधीश सुद्धा वकिलांच्या दोन बाजू ऐकतो आणि नंतरच मत मांडतो. परंतु, शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यामुळे आम्हाला दुःख वाटते, अशी खंत वैभवी देशमुख यांनी बोलून दाखवली. आम्हाला वाटते की, त्यांनी आमचीही बाजू ऐकावी आणि नंतर विधान करावे. माझे वडील वारकरी होते, त्या नात्याने जरी आमच्या घरी आले नसले तरी आम्ही त्यांना भेटणार आहोत. आमची बाजू आणि घडलेली घटना त्यांना सांगणार आहोत, असे वैभवी देशमुख यांनी सांगितले.
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी भगवान गडावर जाऊन महंत नामदेवशास्त्री यांची भेट घेतली. धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे महंत नामदेवशास्त्रींपुढे सादर केले. देशमुख कुटुंबियांनी कधीही जातीयवाद केला नाही. माझ्या भावाने दलित बांधवाला वाचवण्याचा प्रयत्न केला, असं धनंजय देशमुख नामदेवशास्त्रींना म्हणाले. यावर आम्ही आरोपींना पाठीशी घालणार नाही. भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या कायम पाठीशी राहील, असं आश्वासन महंत नामदेवशास्त्री यांनी देशमुख कुटुबीयांना दिले.