राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाची कामगिरी
हिंगोली (Hingoli Crime) : जिल्ह्यात अवैध मद्यविक्री व हातभट्टी निर्मित विक्री मोठ्या प्रमाणावर वाहतुकीद्वारे होते. यावर पायबंद घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून १ लाख २४ हजार ९२० रुपयाचा मुद्देमाल १४ आरोपीकडून जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलमांतर्गत (Hingoli Crime) गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, (Hingoli Crime) हिंगोली, वसमत या परिसरात अवैध मद्यविक्री, हातभट्टी निर्मित विक्री वाहतुकीच्या माध्यमातून नेहमीच होत असते. यावर पोलिसांसह (State Excise Department) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत होते. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून २० ते २१ जानेवारी रोजी दरम्यान सामुहिकरित्या मोहीम राबवून अवैध मद्यविक्री व हातभट्टी निर्मित विक्री वाहतुकीवर छापा टाकून १४ आरोपीवर दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
या (Hingoli Crime) कारवाईत भरारी पथकाचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (State Excise Department) अधिक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनखाली प्रभारी निरीक्षक टि.बी. शेख, दुय्यम निरीक्षक कृष्णकांत पुरी, प्रदिप गोनारकर, ज्योती गुट्टे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक कांबळे, जवान आडे, राठोड यांच्या पथकाने कारवाई करत देशी मद्याच्या १०८ मिलीच्या ६३२ बाटल्या, विदेशी मद्याच्या १८० मिलीच्या ११ बाटल्या, हातभट्टी दारु १५ लिटर रसायन २६० लिटर व एक दुचाकी वाहन असा एकूण १ लाख २४ हजार ९२० रूपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला. त्यांच्यावर दारुबंदी कायद्यानुसार १४ आरोपीविरुध्द विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.