हिंगोली (Hingoli) :- दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) भारतीय जनता पक्षाला घवघवित यश प्राप्त होऊन एक हाती सत्ता आल्याबद्दल हिंगोली शहर भाजपा तर्फे आज गांधी चौक येथे ढोल ताशा च्या गजरात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
ढोल ताशा च्या गजरात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त
यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, माजी आमदार गजाननराव घुगे, माजी आमदार रामराव वडकुते माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर शहराध्यक्ष कैलाशचंद्र काबरा, हमीद प्यारेवाले, प्रशांत उर्फ गोल्डी सोनी, महिला शहराध्यक्ष अलका लोखंडे, तालुकाध्यक्ष माणिक लोडे,नंदाताई इंगळे ,सुनंदा मिश्रा, सुनीता मुळे,कृष्णा रुहातिया, रजनीश पुरोहित, आशिष शर्मा, गुडू देवकाते, बाबा घुगे, मनोज शर्मा, कैलास शहाने, कृष्णा ढोके, नागेश बांगर, नारायण खेडेकर, अंकुश आहेर सचिन शिंदे, जहिरव ताई, जय घोडे, आशिष जयस्वाल आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.