Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरूवार, २१ नोव्हेंबर २०२४

1 day ago 1

जाणून घ्या तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? | File Photo

चिराग दारुवाला

Published on

21 Nov 2024, 12:30 am

Updated on

21 Nov 2024, 12:30 am

Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.

मेष : भावनिक होवून घेतलेल्‍या निर्णयामुळे अनेक गोष्‍टी घडू शकतात

Daily Horoscope

मेष File Photo

मेष : आज दिवस संमिश्र आहे. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल राहील. तुमच्या कौशल्याची समाज आणि नातेवाईकांकडून प्रशंसा होईल. अपेक्षित निकाल मिळाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. घाईघाईने आणि भावनिक होवून घेतलेल्‍या निर्णयामुळे अनेक गोष्‍टी घडू शकतात. वाहन किंवा महागड्या उपकरणाचे नुकसानामुळे खर्चात भर पडू शकते. व्यवसायातील कामे थोडी मंद राहतील. पती-पत्नीचा सुसंवाद राहील. मानेच्या आणि खांदेदुखीचा त्रास होऊ शकतो.

वृषभ : प्रयत्‍नांना आज यश मिळेल

Daily Horoscope

वृषभFile Photo

वृषभ : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्‍या प्रयत्‍नांना आज यश मिळेल. समविचारी लोकांसोबत चर्चा होईल. नोकरदार महिला आपल्या जबाबदाऱ्या योग्‍यरित्‍या पार पाडतील. आर्थिक स्थितीत चढ-उतार जाणवतील. प्रवास टाळा. कामाच्या ठिकाणी केलेले बदल फायदेशीर ठरतील. पती-पत्नीच्‍या नात्‍यात तणाव राहील. आहाराची काळजी घ्‍या.

मिथुन : नवीन तंत्रज्ञानाचा वापर तुम्‍हाला फायदेशीर ठरेल

Daily Horoscope

मिथुनFile Photo

मिथुन : आज नवीन तंत्रज्ञानाचा वापर तुम्‍हाला फायदेशीर ठरेल. मागील काही दिवसांपासून सुरु असणारे नातेवाईकांसोबतचे गैरसमजही दूर होतील. तुमच्‍या कार्यशैलीची चर्चा करू नका. तरुणांनी करिअर आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. पती-पत्नीचे नाते मधूर होईल. आरोग्य चांगले राहील.

कर्क : योग्‍य कृतीचे परिणामही योग्‍य मिळतील

Daily Horoscope

कर्कFile Photo

कर्क : आजचा दिवस अनुकूल आहे. तुम्‍हाला मित्राकडून महत्त्‍वाची बातमी मिळू शकते. योग्‍य कृतीचे परिणामही योग्‍य मिळतील. अचानक एखादी समस्‍या उद्भवू शकते म्हणून सावधगिरी बाळगा. कामाचा दबाव जाणवेल. काही लोक तुमच्‍या कामात अडचण आणण्‍याचा प्रयत्‍न करु शकतात. कृषीविषयक कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल.

सिंह : आज धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमचे विशेष योगदान असेल

Daily Horoscope

सिंहFile Photo

सिंह : आज धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमचे विशेष योगदान असेल. तुम्ही तुमचे काम विचारपूर्वक आणि शांततेने पूर्ण कराल. अडकलेले किंवा उधार घेतलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. घरातील एखादा सदस्य वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांमुळे चिंतित होऊ शकतो. शांततापूर्ण तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. घराची देखभाल आणि मनोरंजनाच्या वस्तूंच्या खरेदीमुळे खर्च वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी काही ठोस आणि महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तुमच्या कामात तुमच्या जोडीदाराचे किंवा कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुमच्या चिंता कमी करू शकते. आरोग्य चांगले राहील.

कन्या : आजचा दिवस तुमच्या मनाप्रमाणे व्‍यतित कराल

Daily Horoscope

कन्याFile Photo

कन्या : आजचा दिवस तुमच्या मनाप्रमाणे व्‍यतित कराल. तुम्ही स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवाल. प्रियजनांना मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. तुमची जीवनशैलीही सुधारण्याचा प्रयत्न करत राहा. दिवसाच्या उत्तरार्धात चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये गोंधळात पडू नका. करिअर आणि कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण आनंदाने राहील. आरोग्य चांगले राहिल.

तूळ : स्वप्नरंजनात रमणे तुमच्‍यासाठी निराशाजनक

Daily Horoscope

तूळ File Photo

तूळ : आज तुम्‍ही नवीन कामांची योजना असू शकते. आध्यात्मिक कार्यक्रमातही सहभागी व्‍हाल. कोणावरही आंधळा विश्‍वास ठेवू नका. स्वप्नरंजनात रमणे तुमच्‍यासाठी निराशाजनक असेल. रक्‍तदाबाचा त्रास असणार्‍यांनी विशेष काळजी घ्‍यावी.

वृश्चिक : विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल

Daily Horoscope

वृश्चिकFile Photo

वृश्चिक : आज तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडू शकाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. कोणत्याही प्रकारचे बँकिंग करताना काळजी घ्या. बेकायदेशीर कामात सहभागी असणार्‍यांपासून लांब राहावा. अतिकामाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अंतर्गत प्रणाली सुधारली जाऊ शकते. घरातील वातावरण सकारात्मक राहू शकते. आरोग्याच्या समस्‍या जाणवतील.

धनु : कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल

Daily Horoscope

धनुFile Photo

धनु : आज अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाने अनेक अडचणींवर मात कराल. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित राहील. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यातील सहभाग तुम्‍हाला नवी उर्जा प्रदान करेल. करिअरशी संबंधित समस्या आज थोड्या थोड्या प्रमाणात सुटू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल, तुमच्या विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढा.

मकर : गुंतवणुकीबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्‍या

Daily Horoscope

मकरFile Photo

मकर : आजचा दिवस अनुकूल आहे. मित्रांच्या भेटीमुळे आणि एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा केल्याने मनःशांती मिळेल. नवीन माहितीही मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत योग्य वेळ घालवल्यानेही सकारात्मक वातावरण निर्माण होईल. गुंतवणुकीबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्‍या. व्यापारात अधिक स्पर्धा होऊ शकते. घरातील वातावरण प्रसन्न ठेवता येईल. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ : व्यवसायातील वातावरण तुमच्या अनुकूल असू शकते

Daily Horoscope

कुंभFile Photo

कुंभ : मुलांच्या भविष्याचे नियोजनावर विचार कराल. स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनुकूल काळ आहे. व्यवसायातील वातावरण तुमच्या अनुकूल असू शकते. जवळच्या नातेवाईकासोबतचे वाद टाळा. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खरेदी करताना तुमच्या बजेटची काळजी घ्या. आरोग्‍याची काळजी घ्‍या.

मीन : घरातील धार्मिक कार्यामुळे सकारात्मकता अनुभवाल

Daily Horoscope

मीनFile Photo

मीन : आजचा बहुतांश वेळ घरातील कामात आणि नातेवाईकांसोबत व्‍यतित कराल. घरातील धार्मिक कार्यामुळे सकारात्मकता अनुभवाल. दिवसाच्या उत्तरार्धात थोडी चिंता राहील. काही विरोधक तुमच्याबद्दल मत्सर पसरवू शकतात. व्यावसायिक दृष्टिकोनातून वेळ उत्तम राहील. बाहेरच्या व्यक्तीला कौटुंबिक वातावरणात ढवळाढवळ करू देऊ नका. आरोग्य चांगले राहिल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article