देवळाली व निफाडमध्ये मजमोजणीच्या प्रत्येकी २० फेऱ्या होणार असल्याने या दोन्ही मतदारसंघांचे निकाल सर्वात पहिले हाती येणार आहेत. file
Published on
:
22 Nov 2024, 4:37 am
Updated on
:
22 Nov 2024, 4:37 am
नाशिक : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टप्पा पार पडल्यानंतर अवघ्या जिल्ह्याचे लक्ष शनिवारी (दि. २३) होणार्या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. देवळाली व निफाडमध्ये मजमोजणीच्या प्रत्येकी २० फेऱ्या होणार असल्याने या दोन्ही मतदारसंघांचे निकाल सर्वात पहिले हाती येणार आहेत. नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक 30 फेऱ्या होणार आहेत.
विधानसभेच्या 15 जागांसाठी जिल्ह्यात बुधवारी (दि. २०) शांततेत मतदान पार पडले. यंदा जिल्ह्यात ६९.१२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल १९६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. मतदानानंतर आता ठिकठिकाणी निकालाच्या चर्चा रंगत आहेत. शनिवारी (दि. २३) सकाळी 8 पासून त्या-त्या मतदारसंघांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
जिल्ह्यातील 15 ही मतदारसंघांमध्ये एकाचवेळी पोस्टल मतमोजणीने प्रारंभ हाेईल. त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल. मतमाेजणीसाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर चार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती असणार आहे. तसेच प्रत्येक सात टेबलसाठी १ अधिकारी, टॅब्युलायजेशन पथक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असा मोठा लवाजमा मतमोजणीसाठी तैनात असेल. साधारणत: दुपारी 1.30 ते 2 पर्यंत सर्व कल हाती येतील, असा अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे.
नांदगाव २५
मालेगाव मध्य २५
मालेगाव बाह्य २६
बागलाण २१
कळवण २५
चांदवड २२
येवला २४
सिन्नर २५
निफाड २०
दिंडोरी २७
नाशिक पूर्व २४
नाशिक मध्य २२
नाशिक पश्चिम ३०
देवळाली २०
इगतपुरी २२