ICC Champions Trophy 2025 स्पर्धेतून अनुभवी खेळाडू ‘आऊट’, टीमला झटका

2 hours ago 1

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. पाकिस्तानकडे स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. त्यामुळे टीम इंडिया आपले सर्व सामने हे दुबईत खेळणार आहे. या स्पर्धेसाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. अशात या स्पर्धेतून दुसरा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. खेळाडू बाहेर झाल्याने टीमसाठी हा मोठा झटका आहे. तसेच या खेळाडूच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही.

दक्षिण आफ्रिकेच्या एनरिच नॉर्खिया याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर मिचेल मार्श हा या स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. आयसीसीने सोशल मीडियावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचा टी 20i कॅप्टन आणि बॅटिंग ऑलराउंडर आहे. एक ऑलराउंडर हा 2 खेळांडूच्या तोडीचा असतो. मिचेल बाहेर झाल्याने ऑस्ट्रेलियासाठी हा तगडा झटका समजला जात आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), ॲलेक्स कॅरी, नॅथन एलिस, आरोन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झॅम्पा.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article