बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिला सामना Pudhari Photo
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना आज (दि.22) पर्थ येथे होत आहे. यामध्ये भारतीय संघाने जिंकून पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर आहे. यासामन्यात भारताकडून नितीश रेड्डी आणि हर्षित राणा पदार्पण करत आहेत. तर ऑस्ट्रेलियाकडून मॅकस्विनी पदार्पण करत आहे. भारताने यापूर्वी या मैदानावर 4 सामने खेळले आहेत. दोन्ही देशांमधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा हा पहिलाच सामना आहे. 1992 नंतर प्रथमच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मागील मालिकेत भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा विजेता आहे. परंतु मायदेशात न्युझीलंड संघाकडून 3-0 असा पराभव झाला होता. आता या सामन्यात भारतीय संघ कसा उभारी घेतोय याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.
IND VS AUS First Test Live| पहिल्या कसोटी सामन्याचा पिच रिपोर्ट
या मैदानाच्या खेळपट्ट्याबद्दल बोलायचे तर, जगातील सर्वात वेगवान आणि धोकादायक खेळपट्ट्यांमध्ये याची गणना केली जाते. कारण येथील विकेट देखील सध्याच्या ऐतिहासिक मैदानाच्या अचूक खेळपट्टीसमोर असेल. या नव्या मैदानावर आतापर्यंत फक्त चार कसोटी सामने खेळले गेले आहेत. येथे वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व कायम राहिले आहे. या खेळपट्टीवर उसळी आणि वेग स्पष्टपणे दिसतो. मैदानाच्या खेळपट्टी क्युरेटरने आधीच सांगितले आहे की, त्यांनी या कसोटी सामन्यासाठी अतिशय वेगवान खेळपट्टी तयार केली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन क्युरेटर आयझॅक मॅकडोनाल्ड देखील सामन्यापूर्वी येथील खेळपट्टीवर काही गवत सोडू शकतात ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळेल, चेंडू स्विंग होईल आणि बाउंस देखील मिळेल. जसजसा सामना पुढे सरकतो आणि खेळपट्टीत तडे जातात, तसतसे काही डावांनंतर फिरकीपटूंनाही फायदा होताना दिसतो, त्यामुळे दोन्ही संघ त्यांच्या प्लेइंग-11 मध्ये किमान एक तरी स्पेशालिस्ट फिरकीपटू निश्चितपणे समाविष्ट करतील.