लग्नानंतर चार वर्ष नवऱ्याने सेक्स टाळलं, अखेर एक दिवस सत्य समजल्यानंतर पत्नीला बसला धक्का

6 hours ago 1

लग्नानंतर मुलबाळ व्हावं, कुटुंब आनंदी रहावं अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. पण प्रत्येक मुलीच्या नशिबात हे सुख नसतं. मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये असच एक प्रकरण समोर आलय. एका महिलेने कुटुंबियांच्या पसंतीने लग्न केलं. पण नवऱ्याने चार वर्ष तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाहीत. आधी नवरा काहीतरी कारण देऊन टाळाटाळ करायचा. उपचार चालू आहेत, वैगेरे अशी तो कारणं द्यायचा. पण नंतर बायकोने त्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. सून उद्या कुठला मोठा वाद निर्माण करेल, म्हणून सासरच्यांनी तिच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. सासरकडची मंडळी इतकी धास्तावलेली की, रात्री भाऊ आणि वहिनीसोबत नणंद त्यांच्या रुममध्ये झोपू लागली.

सूनेवर नजर ठेवण्यासाठी त्यांनी हे सर्व सुरु केलं. एकदिवस सून मार्केटमध्ये काही वस्तू आणण्यासाठी म्हणून गेली, तिथे नवऱ्याला नको त्या अवस्थेत पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. नवरा महिलांचे कपडे घालून तृतीयपंथीयांच्या टोळीसोबत फिरत होता. तिने तिथेच मोठा गोंधळ घातला. मी एक इवेंट कंपनीत काम करतो, म्हणून असे कपडे घालून फिरतोय असं त्याने पत्नीला सांगितलं.

ती रडत-रडतच घरी आली

महिलेने त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही. ती रडत-रडतच सासरी आली. सासरकडच्या मंडळींना सर्व सांगितलं. पण इथे तिच्यासोबत उलटच घडलं. सासरकडच्या मंडळींनी उलट तिलाच सुनावलं, धमकावलं. तिला घराबाहेर पडण्यावर बंदी घातली. सासरकडचे लोक तिच्याकडे 2 लाख रुपये आणि स्कूटरची मागणी करत होते, असा सुद्धा आरोप आहे. महिला एक दिवस घरातून निसटण्यात यशस्वी ठरली. तिने थेट पोलीस ठाणे गाठलं. तिने तिथे पती आणि सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदवला.

पती काय कारण द्यायचा?

2020 मध्ये महिलेच मोठ्या धुमधडाक्यात लग्न झालं होतं. महिलेच्या कुटुंबियांनी लाखो रुपयाच सामना हुंडा म्हणून दिलं होतं. लग्नाला चार वर्ष झाली, तरी पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंध झाले नाहीत. पत्नीने विचारल्यानंतर पती डॉक्टरकडून उपचार सुरु असल्याचे कारण द्यायचा. महिलेने या बद्दल जाब विचारायला सुरुवात केली, तेव्हा सासरकडच्या लोकांनी त्यांच्या रुममध्ये झोपण्यासाठी नणंदेला पाठवायला सुरुवात केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article