संजय राऊतांकडून प्रकाश आंबेडकरांचा अपमान:संजय शिरसाट यांचा दावा; म्हणाले - हा सर्व दलित समाजाचा अपमान

5 hours ago 1
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांचा अवमान केला आहे. एकेकाळी हेच लोक त्यांचे पाय धरण्यासाठी गेले होते. त्यामुळे आंबेडकरांचा अवमान हा संपूर्ण दलित समाजाचा अपमान आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट यांनी शुक्रवारी पत्रकारांशी नियमित संवाद साधला. त्यात त्यांनी संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांच्या सत्तेसोबत जाण्यासंबंधीच्या विधानाचा उपरोधिक समाचार घेतला. प्रकाश आंबेडकर हे लोकशाही मानणारे नेते आहेत. त्यांचे 50 - 60 आमदार निवडून आले व आम्हाला 50 - 60 आमदारांची गरज लागली, तर आम्ही त्यांची निश्चितच मदत घेऊ, असे राऊत उपरोधिकपणे म्हणाले होते. प्रकाश आंबेडकरांवरील टीका निषेधार्ह संजय शिरसाट त्यावर बोलताना म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी सत्तेसोबत जाण्याची एक चांगली भूमिका घेतली आहे. सत्तेसोबत राहून पक्षाचा विस्तार करता येतो. सत्तेमध्ये राहिल्यामुळे ज्या मतदारसंघात आपले उमेदवार निवडून आले नाही, पण तेथील मतदारांना आपण दिलेली आश्वासने पूर्ण करता येतात. त्यामुळे त्यांनी घेतलेली भूमिका स्वागतारार्ह आहे. पण संजय राऊत यांनी त्यांच्या या विधानाची उडवलेली खिल्ली निषेधार्ह आहे. त्यांनी आंबडेकरांचा अवमान आहे. अशा पद्धतीने एखाद्या नेत्याचा अपमान करणे गैर आहे. एकेकाळी त्यांचे पाय धरायला त्यांचे पाय चेपायला हेच लोक गेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाचा हा अपमान सर्वच दलित समाजाचा अपमान आहे असे मी मानतो, असे ते म्हणाले. आमची सत्ता येणार हे राऊतांनी केले मान्य सत्तास्थापन करण्याचा निर्णय ठराविक मुदतीत झाला नाही तर भाजपवाले गौतम अदानी यांनाही मुख्यमंत्री करतील, या संजय राऊत यांच्या टीकेचाही संजय शिरसाट यांनी यावेळी समाचार घेतला. ते म्हणाले, गौतम अदानी यांना करू किंवा अंबानींना करू किंवा नाही जमले तर तुमच्या राजपुत्राला करू. त्याची चिंता तुम्ही करू नका. कुणाला मुख्यमंत्री करायचा हा निर्णय घेण्याचा अधिकार आमचा आहे. याद्वारे त्यांनी राज्यात सत्ता आमची येणार असल्याचेच मान्य केले आहे हे काही कमी नाही. जे निवडून येतात त्याची यादी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असते. हा निव्वळ ढ विद्यार्थ्याने केलेला आरोप आहे. शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्याने इतिहासावर बोलावे असा हा प्रकार आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी असे बोलू नये. हा मूर्खपणाचा कळस आहे, असे ते म्हणाले. अपक्षांसाठी महायुतीचे दरवाजे खुले बंडखोर व अपक्ष उमेदवारांसाठी महायुतीचे दरवाजे खुले असल्याचेही शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, महायुतीला बहुमत मिळाले तरी आमचे दरवाजे बंडखोर व अपक्ष उमेदवारांसाठी खुले आहेत. ज्यांची आमच्यासोबत येण्याची इच्छा आहे, त्यांनी यावेत. त्यांचे स्वागत असेल. आम्ही स्वतः इतर काही अपक्षांच्या संपर्कात आहोत. आम्ही ही गोष्ट नाकारत नाही. कारण, सत्ता बहुमताची असेल तर सत्ता चालवणे सोपे जाते. आम्ही अनेक निर्णय घेतानाही विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करतो. हे सरकार संकुचित विचारांचे नाही. हे सरकार मी पणाचे नाही. हे सरकार हुकूमशाहीचे नाही. हे लोकांचे सरकार आहे. त्यामुळे निर्णय घेण्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असावा असे मानणारे आम्ही लोक आहोत. ...तर 2-4 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. संजय शिरसाट यांनी त्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, हा कायदेशीर पेच आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतरच्या 48 तासांत राज्यपालांकडे बहुमताचा आकडा सादर करावा लागतो. राज्यपाल त्याला मंजुरी देतात. त्यांच्या प्रोटोकॉलनुसार शपथविधी सोहळा पार पडतो. पण त्या काळात आमदारांच्या याद्या आल्या नाही, तर त्या काळात राष्ट्रपती राजवट 2-4 दिवसांसाठी का होईना लागेल. हा राज्यपालांचा अधिकार आहे. 'बटेंगे तो कटेंगे'वरही भाष्य केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है आदी वादग्रस्त विधानांविषयी अहवाल मागितला आहे. त्यावर संजय शिरसाट म्हणाले की, त्यात काहीच वादग्रस्त नाही. त्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच नाही. एक है तो सेफ है, या घोषणेचा अर्थ भारताचे नागरीक एकजूट असतील तर सुरक्षित राहतील असा आहे. त्यामुळे त्यात वाईट काहीच नाही. बटेंगे तो कटेंगे ही घोषणाही त्याच धर्तीवरची आहे. कुणी कसा अर्थ घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारला पाठवलेल्या नोटीसीला योग्य ते उत्तर दिले जाईल. या दोन्ही घोषणांचा अर्थ आपापल्या परीने लोकांनी घेतला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article