युतीचा विजय की आघाडीचा पराभव?:राजकीय विश्लेषक म्हणतात - दोन्ही आघाड्यांपैकी एकीला काठावर नव्हे भक्कम बहुमत मिळेल
6 hours ago
1
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान झाले. त्यानंतर आता उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला जनतेचा कौल मिळणार असल्याचे भाकित एक्झिट पोल्सनी व्यक्त केले आहे. त्यातही हे बहुमत अगदी काठावरचे असेल असा त्यांचा अंदाज आहे. पण राजकीय विश्लेषकांना असे वाटत नाही. त्यांच्या मते मतांचा वाढलेला टक्का पाहता महायुती किंवा महाविकास आघाडी या दोन्ही पैकी कोणत्याही एका आघाडीला भक्कम बहुमत मिळेल. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे साध्या सरळ भाषेत विश्लेषण केले आहे. ते खाली वाचा जशास तसे... युती आणि आघाडी यांच्यात फार फरक नसेल असे सर्वसाधारण भाकित आहे. मात्र मतांचा टक्का ज्या रीतीने वाढला आहे ते पाहता या दोहोंपैकी एकाला भक्कम बहुमत मिळेल ही शक्यताही वाढली आहे.
शक्यतेचा हा काटा महायुतीच्या बाजूने झुकला तर त्याची कारणे अशी असतील- हे लिहित असतानाच एक्सिस माय इंडियाचा अंदाज आला आहे. त्याने युतीला १७८ जागा दिल्या आहेत. त्या अविश्वसनीय वाटतात. मात्र छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि हरियाणा यांची उदाहरणे विसरून चालणार नाही. महायुतीला इतके नाही तरी अगदी साधे बहुमत मिळाले तरीही तो त्यांच्या विजयापेक्षा आघाडीचा पराभव अधिक असेल. याउलट वाढीव टक्का व एकूण असंतोष आघाडीच्या बाजूने झुकलाच तर तो मात्र त्यांचा व पैशाच्या आमिषांना दाद न देणाऱ्या जनतेचा विजय म्हणावा लागेल.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)