Published on
:
05 Feb 2025, 4:43 am
Updated on
:
05 Feb 2025, 4:43 am
नागपूर : जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर गुरुवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात एक दिवसीय क्रिकेटचा सामना होणार आहे. या सामन्यासाठी २ फेब्रुवारीला नागपुरात आलेल्या भारतीय संघाने मंगळवारी मैदानावर घाम गाळत धावपट्टीचा अभ्यास केला. इंग्लंड संघाने रात्री ५ ते ८ या वेळेत धावपट्टीचा अभ्यास केला. आज इंग्लंड संघ दुपारच्या वेळेस सराव करणार आहे, त्यानंतर ४ ते ८ यावेळेत भारतीय संघ या धावपट्टीचा सराव करणार आहे.
सहा वर्षानंतर पहिल्यांदाच शहरात भारत आणि इंग्लड संघात एक दिवसीय क्रिकेट सामना होत आहे. शहरातील वातावरण क्रिकेटमय झाल्याचे दिसून येत आहे.
शुभमन गील म्हणाला, 'नागपूरकर ग्रेट'
पीचवर गवत जास्त वाढल्यामुळे रात्रीच्या सुमारास धुके पडल्याने चेंडू लवकर ड्राय होत नाही. मैदानावरील वाढलेले गवत कापण्याचे काम युध्द स्तरावर सुरु झाले आहे. भारतीय संघात अनुभवी खेळाडू आहेत. ते चांगल्या खेळाचे प्रदर्शन करतील. शहरात क्रिकेट या खेळाविषयी चांगले वातावरण आहे. शहरातील क्रिकेटप्रेमी खेळाडूंना प्रोत्साहित करतात, त्यामुळे खेळाडू पुन्हा उत्साहाने खेळतात, अशा शब्दात भारतीय क्रिकेटपटू शुभमन गीलने पत्रकार परिषदेत नागपूरच्या क्रिकेटप्रेमींची प्रशंसा केली.