Published on
:
05 Feb 2025, 7:46 am
Updated on
:
05 Feb 2025, 7:46 am
सातारा, पुढारी वृत्तसेवा: माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाने आज (दि.५) छापा टाकला. सकाळी ७ वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू आहे. बंगल्यामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही.