सुट्टीत फिरण्यासाठी किंवा एखाद्या कामानिमित्त, कोणत्याही कारणाने दुसऱ्या शहरात जाणं झालं, तर बरेच लोकं हॉटेलमध्ये स्टे करतात. अशा वेळेस ती रूम सेफ आहे का, त्यात कॅमेरा तर लपवलेला नाहीये ना, याची खात्री करून घेणं गरजेचं असतं. एखाद्या खोलीत हिडन कॅमेरा तर नाही असे प्रश्न आपल्या मनात येऊ शकतात. देश असो किंवा परदेश, काही ठिकाणी अशा घचना घडल्या आहेत जिथे एखाद्या रूममध्ये कॅमेरा लपवून तिथे राहणाऱ्या लोकांची, किंवा जोडप्याचे फोटो काढले गेले, किंवा आपत्तीजनक स्थितीतील व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आलेत. पण अनेक हॉटेल्स त्यांच्या ग्राहकांच्या गोपनीयतेची काळजी घेतात आणि त्यांच्या खोल्यांमध्ये कॅमेरे नसतात. एखाद्या खोलीत छुपा कॅमेरा आहे की नाही हे कसे शोधायचे ते आपण आज जाणून घेणार आहोत.
सीलिंग फॅन तपासा
होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे. हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर, जेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत जाल तेव्हा सीलिंग फॅनमधून लाल दिवा चमकत आहे का ते तपासा. यासाठी तुम्ही टॉर्च किंवा फ्लॅशलाईटचा वापर करू शकता.
विचित्र वस्तूंकडे दुर्लक्ष करू नका
जेव्हाही तुम्ही खोलीत जाल तेव्हा अशी जागा शोधा जिथून बहुतेक खोली दिसू शकेल. अशा ठिकाणी कॅमेरा लपवला जाऊ शकतो. यामध्ये विषमपणे, विचित्रपणे लावलेले आरसे किंवा इतर सजावटीच्या वस्तू असतात. एखादी वस्तू खोलीत असण्याची काहीच गरज नाही, किंवा योग्य जागी नाहीये, असं तुम्हाला वाटलं तर ती लगेच चेक करा. अगदी अनावश्यक वाटणारी अतिरिक्त वायर देखील छुप्या कॅमेऱ्याला जोडलेली असू शकते.
विद्युत उपकरणांमध्येही लपवू शकतात कॅमेरा
बहुतांशक लपविलेल्या कॅमेरा उपकरणांना ऑपरेट करण्यासाठी वीज लागते. त्यामुळे, खोलीत विजेच्या अतिरिक्त तारा आहेत की नाही किंवा लुकलुकणारे दिवे आहेत का ते नीट तपासा.
स्पीकरचीही करा तपासणी
छुपे कॅमेरे हे म्युझिक सिस्टीम किंवा अगदी टीव्हीच्या स्पीकर आणि स्पीकर मेशमध्ये सहजपणे ठेवलेले असतात. हे टॉर्चच्या प्रकाशाने शोधले जाऊ शकतात. कॅमेरा लपलेला आहे हे तुम्हाला नीट कळू शकले नाही, तर तुम्ही तो रुमाल, टॉवेल किंवा टिश्यू पेपरने झाकून ठेवू शकता.
हुक किंवा टॉवेल होल्डरकडे लक्ष द्या
केवळ खोलीतच नाही तर बाथरूममध्येही कॅमेरा लपवलेला असू शकतो. म्हणूनच, बाथरूम वापरण्यापूर्वी हुक, टॉवेल होल्डर किंवा हेअर ड्रायर होल्डर नीट तपासा.
फायर अलार्म किंवा स्मोक डिटेक्टर्स
सामान्यतः लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या उपकरणांमध्येही कॅमेरा लपवला जाऊ शकतो. म्हणून, ही उपकरणे नीट तपासा.
डोअर नॉब, हँडल्स
खोलीमध्ये अशी काही ठिकाणे आहेत जिथे कॅमेरे लपवले जाऊ शकतात आणि अनेकदा या जागा कोणाच्याही लक्षात येत नाहीत. म्हणून, दरवाजाचे नॉब, हँडल आणि दरवाजे देखील नीट तपासा.
लाईट बंद करून लेन्स तपासा
जर तुम्हाला कॅमेऱ्याचा लुकलुकणारा लाल दिवा दिसत नसेल तर एक सोपा उपाय आहे. खोलीतील सर्व दिवे बंद करा. लेन्सचा रिफ्लेक्टिव पृष्ठभाग अंधारात दिसू शकतो. म्हणून, सर्व दिवे बंद करा आणि लुकलुकणारे किंवा रिफ्लेक्टिव दिवे पहा.
फिंगर नेल मिरर ट्रिक
तुमच्या बोटाचे नख आरशावर ठेवा, त्याचे प्रतिबिंब आरशात दिसतं का ते पहा. ते प्रतिबिंब आणि तुमचे बोट यांच्यामध्ये अंतर नसेल तर आरशच्या उलट्या बाजूला कॅमेरा लावलेला असू शकतो.