Rasha Thadani Dance: बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी तुफान चर्चेत आली. नुकताच राशा हिने ‘आझद’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. राशाच्या पहिल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फार कमाल केली नसली तरी, ‘उई अम्मा’ गाण्यावर राशाच्या जबरदस्त डान्सने सर्वांना घायाळ केलं.
आता देखील राशाचा एका व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राशा, अभिनेता विकी कौशलच्या ‘तौबा तौबा’ गाण्यावर थिरकली आहे. सध्या राशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तिला प्रसिद्ध कोरिओग्राफर बॉस्को मार्टिसने साथ दिली आहे.
हे सुद्धा वाचा
राशाच्या डान्स व्हिडीओवर विकी याने कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. विकी म्हणाला, ‘आता बॉस्को सर माझ्याकडून ‘उई अम्मा’ गाण्यावर डान्स करून घेऊदे नको म्हणजे मिळवलं. खूपच Smooth डान्स केलास, अशीच प्रगती कर…”, एवढंच नाही तर अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने देखील राशा आणि तिच्या डान्सचं कौतुक केलं आहे. फायर इमोजी देत धकधक गर्लने राशाचं कौतुक केलं आहे.
राशा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अद्याप तिने प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली नाही. राशा हिने करीयरला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर राशाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राशा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत असतात.