अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यांच्या निर्णयाचा आणि धोरणांचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. त्यांच्या धोरणामुळे अनेक गुतंवणूकदारांना सोनेचांदीत गुतंवणूक वाढवल्याने सोन्याचे दर 87 हजार प्रति 10 ग्रॅनपर्यंत वधारले आहेत. तसेच त्यांनी अवैध रहिवाशांविरोधातही कठोर कारवाई केली आहे. आता त्यांनी इराणला थेट धमकी दिली आहे. माझ्या जीवाचे काही बरोवाईट झाल्यास, इराण नसेतनाबूत होईल, त्याबाबतचे योग्य ते आदेश आपण दिले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला थेट धमकी दिली आहे. ट्रम्प म्हणाले, तेहरानने मला मारण्याचा प्रयत्न केला तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. ट्रम्प यांनी इराणवर आर्थिक दबाव आणण्यासाठी एका कार्यकारी आदेशावरही स्वाक्षरी केली आहे. इराणने मला मारण्याचा प्रयत्न केला तर इराण पृथ्वीवरून नष्ट होईल. इराण पूर्णपणे नष्ट होईल, याबाबतचे आदेश आपण अधिकाऱ्यांना दिले आहेत.
अमेरिकन सरकार राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना इराणकडून असलेल्या संभाव्य धोक्यावर लक्ष ठेवून आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पेनसिल्व्हेनियातील एका रॅलीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले होते. निवडणूक रॅलीदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला, एक गोळी त्यांच्या कानाला घासून गेली. या घटनेनंतर पुन्हा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनांनंतर इराणवर आरोप होऊ लागले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी आता इराणला थेट धमकी दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. यावेळी ट्रम्प यांनी गाझाबाबतच्या ब्लू प्रिंटबाबत चर्चा केली. गाझा संदर्भात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या 5 कलमी आराखड्यात इराणचाही समावेश आहे. ट्रम्प यांनी इराणचे कंबरडे मोडण्यासाठी एका कार्यकारी आदेशावरही स्वाक्षरी केली आहे. यामध्ये अमेरिकन सरकारला इराणवर जास्तीत जास्त दबाव आणण्यास सांगितले आहे.