आयपीएल मेगा ऑक्शन 2025 मध्ये आतापर्यंत अनेक कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडूंचं नशिब फळफळलं आहे. तर दुसऱ्या बाजूला काही खेळाडू हे दुर्देवी ठरले आहेत. मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी 25 नोव्हेंबरला भारतीय खेळाडूंसह परदेशी खेळाडूही अनसोल्ड राहिले. टीम इंडिया आणि आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्यासह एकेकाळी भरमैदानात भिडणारा खेळाडू दुर्देवी ठरला आहे. या खेळाडूला कोणत्याच फ्रँचायजीने आपल्या ताफ्यात घेतलं नाही. तो खेळाडू कोण आहे? जाणून घेऊयात.
अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक हा अनसोल्ड राहिला आहे. नवीन उल हक याच्यावर कुणी बोलीही लावली नाही. नवीनची बेस प्राईज ही 2 कोटी इतकी होती. मात्र 10 पैकी एकाही फ्रँचायजीला नवीनला आपल्या गोटात घ्यावसं वाटलं नाही. याच नवीन उल हक याने आयपीएलच्या 16 व्या हंगामात विराट कोहलीसोबत पंगा घेतला होता.
हे सुद्धा वाचा
आयपीएलच्या 16 व्या हंगामात लखनऊ विरुद्ध आरसीबी यांच्यातील सामन्यात नवीनने विराटसोबत पंगा घेतला होता. नवीन तेव्हा लखनऊ टीमकडून खेळत होता. विराट आणि नवीन यांच्यात भरमैदानात शाब्दिक वादावादी पाहायला मिळाली होती. त्यानंतर लखनऊचा मेन्टॉर गौतम गंभीर याने या वादात उडी घेतली आणि विराटसोबत भिडला होता. त्यानंतर काही महिन्यांनी विराट आणि नवीन या दोघांमध्ये सर्वकाही निट झालं. मात्र आता नवीन अनसोल्ड राहिल्याने साऱ्या क्रिकेट चाहत्यांना अफगाणी क्रिकेटरने विराटसोबत घेतलेला पंगा आठवला.
नवीनची आयपीएल कारकीर्द
नवीन उल हक याने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 18 सामने खेळले आहेत. नवीन 2023 पासून आयपीएलमध्ये खेळतोय. नवीनने आतापर्यंत 18 सामन्यांमध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र लखनऊने त्याला रिटेन केलं. त्यामुळे नवीन ऑक्शनमध्ये उतरला. मात्र नवीनला कोणत्याच टीमने घेतलं नाही. त्यामुळे नवीनचं 18 सामन्यानंतरच आयपीएल करियर संपलं, असं म्हटलं जात आहे.
नवीन उल हक अनसोल्ड
NAVEEN UL HAQ IS UNSOLD…!!!! pic.twitter.com/EWdfAEX8n4
— Johns. (@CricCrazyJohns) November 25, 2024
वनडे वर्ल्ड कपनंतर निवृत्ती
दरम्यान नवीन उल हक याने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र नवीन टी 20 क्रिकेट खेळतोय.