जळगाव (Jalgaon Train Accident) : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वे लाईन वर आज एक भयानक घटना समोर आली आहे. नागपूरकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसचा एका कोचला आग लागल्याचे वृत्त पसरल्यामुळे प्रवाशांनी जीव वाचवण्याच्या भीतीने धावत्या (Jalgaon Train Accident रेल्वेतून उड्या मारल्या. मात्र त्यांचे दुर्दैव असे की समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने चिरडले.
या (Jalgaon Train Accident) भयानक दुर्घटनेत सात ते आठ जणांचा बंगळुरु एक्सप्रेस खाली कटल्याने मृत्यू झाला आहे. याबाबत अद्याप अधिकृत आकडा व माहिती उपलब्ध झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने याची अधिकृत माहिती घेणे सुरू केले आहे. या भयावह प्रकारामुळे एकच खळबळ जिल्ह्यात व रेल्वे प्रशासनात उडाली असून अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. या (Jalgaon Train Accident घटनेमध्ये जखमी झालेल्यांना जळगाव येथे आणण्यात येत असून यासाठी ॲम्बुलन्स व मोठा फौज फाटा जळगाव रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आलेला आहे.