नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या पथकाची साठे चौक येथे कारवाई
परभणी (Jintur Police) : नाकाबंदी दरम्यान जिंतूर येथे पोलिसांच्या पथकाने १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री एका स्कॉर्पिओ वाहनातून १ लाख ५४ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त केली. पोलिसांनी २० लाख रुपयांचे स्कॉर्पिओ वाहनही ताब्यात घेतले असून वाहनामध्ये दोन संशयीत मिळून आले. वाहन जिंतूर पोलिस ठाण्यात लावण्यात आले आहे.
पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक जीवन बेनीवाल, सपोनि. जाधव, सपोनि. शिवरकर व इतर कर्मचारी तसेच एफएसटी पथकातील कर्मचारी साठे चौक येथे नाकाबंदीत होते. यावेळी तयांना जिंतूरकडून परभणीच्या दिशेने येणारे एक स्कॉर्पिओ वाहन दिसले. (Jintur Police) पोलिसांना संशय आल्याने त्यांनी हे वाहन थांबवुन त्याची तपासणी केली असता या वाहनामध्ये १ लाख ५४ हजार ५०० रुपयांची रोकड आणि नावे लिहिलेली रजिस्टरची पाने मिळून आली. वाहनातील इसमांना रोकड विषयी विचारणा केली असता त्यांनी अपेक्षीत उत्तर दिले नाही. सदर रक्कमे बाबत संशय आल्याने पथकाने रोकड जप्त केली. तसेच वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे.