रत्नागिरी : जि.प. भवनात वाहन पार्किंगचा आवार रिकामा होता.pudhari photo
Published on
:
22 Nov 2024, 12:30 am
Updated on
:
22 Nov 2024, 12:30 am
रत्नागिरी ः विधानसेसाठी गुरुवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. या कामात शासकीय अधिकारी, कर्मचारी गुंतले होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे शासकीय कार्यालये उघडली असली तरी जिल्हा परिषद भवनात सन्नाटाच पहायला मिळाला. बहुसंख्य अधिकारी, कर्मचार्यांनी निवडणूक कामाच्या ताणामुळे दांडी मारल्याचे पहायला मिळाले. यामुळे दिवसभर शुकशुकाट होता.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन अर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला आहे. निवडणुकीच्या कामात अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याने जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असणार्या जिल्हा परिषद भवनात शुकशुकाट पसरला आहे. यामुळे नागरिकांच्याही कामाचा खोळंबा होऊ लागला आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतर अनेक शासकीय कार्यालयांतील कर्मचारी व अधिकार्यांची नेमणूक निवडणुकीच्या कामासाठी करण्यात आली आहे. या कालावधीत सर्व शासकीय योजना व विकासकामे बंद असल्याने शासकीय कार्यालयांमधील नागरिक व ठेकेदारांची वर्दळ घटली आहे. जिल्हा परिषदेतही हेच चित्र असून, आचारसंहिता लागल्यापासून सर्वच विभागांत शुकशुकाट आहे. आचारसंहितेमुळे अधिकारी व कर्मचार्यांवरील कामाचा ताण कमी झाल्याने त्यांच्या चेहर्यावर समाधानाचे वातावरण होते.(Maharashtra assembly polls)
मात्र, कार्यालयीन कामकाजातून जराशी विश्रांती मिळते ना मिळते तोच निवडणूक कामासाठी आयोगाने अधिकारी व कर्मचार्यांना ऑर्डर काढल्या आहेत. त्यामुळे या निवडणूक कामासाठी हे कर्मचारी हजर झाले होते.
बुधवारी जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडली. बहुसंख्य अधिकारी व कर्मचार्यांना या कामासाठी नियुक्त करण्यात आले होते. मतदान झाल्यानंतर मतपेटी पोचवण्यापर्यंत त्यांचे काम होते. रात्री उशीरापर्यंत हे काम सुरू होते. मात्र गुरूवारी कार्यालयाला सुट्टी नव्हती. यामुळे त्यांना गुरूवारी कार्यालयात हजर राहणे गरजेचे होते; परंतु या ताणामुळे अनेक कर्मचारी, अधिकार्यांनी गुरुवारी चक्क दांडी मारली. यामुळे जिल्हा परिषद भवनात गुरुवारी शुकशुकाटच पहायला मिळाला. सोमवारनंतरच जि.प. पुन्हा गजबजणार आहे.(Maharashtra assembly polls)