Kalashtami 2025 Upay: सनातन धर्माध्ये कालाष्टमीचे व्रत घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून केले जाते. कालाष्टमीचे व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम फळ मिळण्यास मदत होते. कालाष्टमीच्या व्रताच्या दिवशी कालभैरवची पूजा केली जाते. कालभैरव शंकर भगवानचे उग्र रुप आहे. कालाष्टमीच्या दिवशी योग्य प्रकारे पूजा केल्यामुळे तुम्हाला आयुष्यतील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळण्यास मदत होईल. कालाष्टमीचे व्रत केल्यामुळे तुमच्या भविष्यातील समस्या दूर होतात त्यासोबतच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया कालाष्टमीच्या दिवशी कालभैवची पूजा कशी करावी?
कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवला मोहरीचे तेल अर्पण करणं फायदेशीर ठरते. मान्यतेनुसार, कालभैरवला मोहरीचे तेल अर्पण केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रह दोष दूर होण्यास मदत होते आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळते. तुमच्या आयुष्यातील शत्रूंचा नाश करण्यासाठी काळभैरवाला मोहरीचे तेल अर्पण केले जाते. कालभैरवला मोहरीचे तेल अर्पण केल्यामुळे त्यांच्या शत्रूंवर मात करण्यास मदत होते. मोहरीचे तेल तुमच्या आयुष्यातील नकारात्मक उर्जा दूर करण्यास मदत करते त्यामुळे काळभैरव बाबांना मोहरीचे तेल अर्पण करावे.
काळ्या तिळामध्ये नकारात्मक उर्जा काढून टाकण्यास मदत होते. काळ्या तिळामुळे सकारात्मक उर्जा आकर्षिक करण्यास मदत होत. मान्यतेनुसार, काळे तिळ कालभैरवला अर्पण केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी मिळण्यास मदत होईल. कालभैरवला काळे तिळ अर्पण केल्यामुळे तुमच्यावरील काल सर्प दोष दूर होण्यास मदत होते. काल सर्प दोषामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक प्रकारच्या समस्यांना सामेरं जावं लागते. असे मानले जाते की, कालभैरवला काळे तिळ अर्पण केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होण्यास मदत होते. कालभैरवला जाईचे फूल अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवला जाईचे फूल अर्पण केल्यामुळे तुमच्या घरामध्ये आणि आयुष्यामध्ये सुख समृद्धी येण्यास मदत होते.
हे सुद्धा वाचा
तुमच्या घरातील सदस्यांनमध्ये भरपूर प्रमाणात मतभेद असतील तर कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवला काळी उडदाची डाळ अर्पण करा. यामुळे तुमचे भाग्य चमकते आणि तुमच्या करियरमध्ये तुम्हाला यश मिळण्यास मदत होते. त्यासोबतच कालभैरवला काळी उडदाची डाळ अर्पण केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती मिळण्यास मदत होते. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता निधून जाण्यास मदत होते. कालभैरवला काळी उडदाची डाळ अर्पण करताना कालभैरवाच्या मंत्रांचा जप करावा.