Kalmanuri Police: आरोपींनी व्यवसायीकाला वेगवेगळ्या मार्गाने नेले होते छत्रपती संभाजीनगरला

2 hours ago 1

फार्महॉउसमध्ये केला पोलिसांनी पंचनामा

आखाडा बाळापूर/हिंगोली (Kalmanuri Police) :  कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील व्यवसायीक गणपत शिंदे यांचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी वाहनातून वेगवेगळ्या मार्गाने छत्रपती संभाजीनगर भागात नेउन ठेवले होते. (Kalmanuri Police) पोलीस कोठडी दरम्यान आरोपींनी याबाबत माहिती दिल्याने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे मार्गदर्शनात बाळापूर पोलीस पथकाने पडताळणी केली.

तसेच कार्यवाहीचा (Kalmanuri Police) पोलीस स्टेशन आखाडा बाळापुर यांनी शासकीय पंचा समक्ष पंचनामा केला आहे.काही वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर येथुन गावाकडे दुचाकीने जात आसताना गणपत शिंदे यांचे आरोपींनी अपहरण करून त्यास ताब्यात घेऊन त्यांच्या वाहनामध्ये टाकून कांडली फाटा येथून वारंगा फाटा, हदगाव, उमरखेड, पुसद,वाशिम, मालेगाव, मार्गे समृद्धी महामार्ग येथून दौलताबाद, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)येथील मन्नत रेस्टॉरंट येथे ठेवण्यात आले असल्याची माहिती तपासातून मिळून आल्याने व सदर प्रवासादरम्यान आरोपी यांनी कोणती प्रत्येक ठिकाणी कोण कोणती कार्यवाही केली याबाबत सखोल तपासण्या संबंधाने सदर घटनास्थळाची बारकाईने तपासणी होणे कामी आखाडा बाळापूर येथील पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूर पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, सोबत जमादार शेख अन्सार , सय्यद शाहेद, चालक विजयकुमार जाधव व तलाठी गोविंद बोरगे व तलाठी भंडारे यांनी घटनास्थळी जाऊन सविस्तर पंचानामा केला. घटनास्थळावरून काही साहित्य पथकाने जप्त केले आसल्याच समजले.

दोन वाहने,पिस्टल जप्त, आरोपी शौधार्थ पथक सक्रिय..

अपहरण प्रकरणात (Kalmanuri Police) पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, एलसीबी पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे मार्गदर्शनात एलसीबी सपोनी शिवसांब घेवारे, मल्लपिलू व पोलीस पथकाने चौवीस तासात व्यवसायीकाची सुखरूप सुटका करत सहा आरोपी पकडले होते तर अधी एक कार,दोन पिस्टल, राउंड जप्त केले नंतर हेद्राबाद येथून थार जीप जप्त केली. सदर प्रकरणातील फरार आरोपी शोधार्थ एलसीबी पथके सक्रिय आहेत.अटक आरोपी पाच दिवसाच्या पोलीस कोठडीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article