विजय हजारे स्पर्धेतील अंतिम सामन्यात कर्नाटकाने विदर्भासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. कर्नाटकाने बडोद्यातील कोतंबी स्टेडियममध्ये 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 348 धावा केल्या. कर्नाटकासाठी स्मरण रवीचंद्रन याने सर्वाधिक शतकी खेळी केली. तर विकेटकीपर क्रिष्णन श्रीजीथ आणि अभिनव मनोहर या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तसेच इतर फलंदाजांनी दिलेल्या योगदानामुळे कर्नाटकाला 348 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे आता विदर्भ या धावांचा यशस्वी पाठलाग करत विजय हजारे ट्रॉफी उंचावणार की कर्नाटकाचे गोलंदाज रोखण्यात यशस्वी ठरणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
कर्नाटक प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, अनिश केव्ही, स्मरण रविचंद्रन, कृष्णन श्रीजीथ (विकेटकीपर), अभिनव मनोहर, श्रेयस गोपाल, हार्दिक राज, प्रसीद कृष्णा, वासुकी कौशिक आणि अभिलाष शेट्टी.
विदर्भ प्लेइंग इलेव्हन : करुण नायर (कर्णधार), ध्रुव शोरे, यश राठोड, जितेश शर्मा (विकेटकीपर), शुभम दुबे, अपूर्व वानखडे, हर्ष दुबे, नचिकेत भुते, यश कदम, दर्शन नळकांडे आणि यश ठाकूर.