धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर वाल्मिक कराडने मला मारहाण केली. मला चुकीचा स्पर्श केला. माध्यमांसमोरच करूणा शर्माने वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केला.
करूणा शर्मा यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केलेत. जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिकने आपल्याला मारहाण केली आणि चुकीचा स्पर्श केला, असं माध्यमांसमोरच करूणा शर्मा म्हणाल्या. ‘धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर वाल्मिक कराडने माझ्या कानाखाली मारली. मला चुकीचा स्पर्श केला. मला मारहाण झाली. तेव्हा मी डीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना अर्ज दिला. मला सीसीटीव्ही फुटेज द्या असं म्हटलं होतं. पण अजून दिले नाही. पण वाल्मिक कराडविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे.’, असं करूणा शर्मा म्हणाल्या. मी रखेल नाही. मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे. मला पोटगी मिळाली हा माझा विजय आहे. माझी आई नव्हती. मला तुरुंगात टाकल्यापासून माझ्या बहीण आणि भावाने माझा नंबर ब्लॉक केला आहे. मी एकटीच लढत आहे. तीन वर्षापासून एकटीच लढत आहे. आई असती तर माझ्यावर ही वेळ कधीच आली नसती. माझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात. कोर्टाचा निकाल मला मान्य नाही. मी हायकोर्टात जाणार आहे. मला १५ लाख रुपये पोटगी हवी आहे. दोन लाखात काय होणार. मी रखेल असते तर ५० कोटी रुपयांचे कन्स्ट्रम हायकोर्टात फाईल केलेलं आहे. हवंतर मी त्याची कॉपी देईन. मी रखेल नाही. मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे. समोरचा व्यक्ती मोठा माणूस आहे, तो मंत्री आहे, हे पाहू नका. तुम्ही लढा, असं करूणा शर्मा म्हणाल्या.
Published on: Feb 06, 2025 03:52 PM