Latur Murder case: क्षुल्लक कारणावरून दोघांना भोसकले : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

2 hours ago 1

शहरातील मध्यवर्ती बस्थानकासमोरील घटना

लातूर (Latur Murder case) : दुचाकीला धडक लागल्याच्या कारणावरून बाचबाची होऊन दोघां तरुणांवर धारदार चाकूने वार केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत (Latur Murder case) गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेतील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

सदरच्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मंगळवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकजवळ मोटरसायकलला धडक दिल्याच्या कारणावरून अज्ञात व्यक्तींनी काही तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या तरुणावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.सदरच्या घटनेतील फिर्यादीने दिलेल्या फिर्यादवरून (Latur Murder case) पोलीस ठाणे गांधी चौक पोलीस ठाण्यात येथे गुन्हा क्रमांक कलम 652/2024, 103 (1), 109, 115, 351(2), 351(3) 3 (5) बी. एन. एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, यांचे आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे,उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर, सहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे व (Latur Murder case) पोलीस ठाण्याचे पथके तयार करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात येत होता. पथकांनी तात्काळ कारवाई करत गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करून अवघ्या काही तासातच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे राजपाल उर्फ राजू विठ्ठलराव गायकवाड, वय 33 वर्षे, रा. विक्रम नगर, अजय सोमनाथ घोडके, वय 27 वर्षे, रा. जुनी लेबर कॉलनी, प्रविण बाबुराव कांबळे, वय 40 वर्षे,रा. एलआयसी कॉलनी लातूर अशी असून पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि आर.आर. कऱ्हे हे पुढील तपास करीत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणे एमआयडीसीच्या पथकाने वरिष्ठांचे मार्गदर्शनात अतिशय शीघ्रगतीने कार्यवाही करत गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करून तात्काळ अटक केली. घटनास्थळावर अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे,सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी भेट देऊन पथकाना उपयुक्त सूचना केल्या. तसेच सर्व (Latur Murder case) पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी साहेबराव नरवाडे, दिलीप सागर, अरविंद पवार, संतोष पाटील यांनी रात्रीतून आपापले पोलीस ठाणे हद्दीमध्ये चोख बंदोबस्त ठेवून शांतता अबाधित ठेवली. सदरच्या पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस अंमलदार विनोद चिलमे, खुर्रम काझी, दिनानाथ देवकते, रियाज सौदागर, युवराज गिरी, जमीर शेख, राजेश कंचे, संतोष देवडे, बंडू निटूरे, सचिन कांबळे, अर्जुन राजपूत, विनोद कातळे यांचा समावेश होता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article