Saswad Politics: पुरंदरचे विमानतळ, राष्ट्रीय बाजार प्रकल्प तसेच गुंजवणी प्रकल्प अपूर्ण आहेत. ते वेळेत पूर्ण न झाल्यामुळे पुरंदरच्या शेतकर्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुरंदर तालुक्याचा विकास करायचा असेल, तर सत्तेतील उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे. भिवडी गावाला हवा तसा भविष्यात निधी दिला जाईल, असे आश्वासन महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांनी दिले.
भिवडीत पुरंदर-हवेली महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या गावभेट दौर्याचे आयोजन केले होते. त्या वेळी येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात शिवतारे बोलत होते. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप यादव, उमेश गायकवाड, केशवआप्पा दिघे, दिलीप वांढेकर, अतुल गायकवाड, पांडुरंग झिंझुर्के, शांताराम जैनक, वसंत अवचरे, गोविंद भिंताडे, बंडा पवार, मोहन क्षीरसागर, अजित गायकवाड, सागर मोकाशी तसेच महायुतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.