महाराष्ट्रातलं सरकार चोरलेलं सरकार आहे, जनतेने निवडून दिलेलं सरकार नाहीये. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात बनलेलं सरकार हे जनतेचं सरकार होतं. हे तर चोरलेलं सरकार आहे, असा सणसणीत टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजप महायुतीला लगावला आहे.
महाराष्ट्रात सरकार पाडलं. तशाच प्रकारे झारखंडमध्येही सरकार पाडण्याचे मोठे प्रयत्न भाजपने केले. आदिवासी असूनही विद्यामान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवलं गेलं. काही ठोस कारणही नव्हतं. त्यांना अटक का केली? असं म्हणत न्यायालयाने जामीन देताना तारेश ओढले, असे दिग्विजय सिंह म्हणाले.
#WATCH Delhi: On Maharashtra elections, Congress leader Digvijaya Singh says, “The government is a stolen one. It is not a publicly elected government. The public elected the alliance government of Congress, Shiv Sena and NCP… They also tried to bring down the Jharkhand… pic.twitter.com/cgejenf5Ot
— ANI (@ANI) November 16, 2024
महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही ठिकाणी आमचं जनतेचं सरकार होतं. आता झारखंडमध्ये आणि महाराष्ट्रात आमच्या आघाडीचं सरकार सत्तेत येईल, असा विश्वास दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है तो सेफ है’ च्या नाऱ्याचाही दिग्विजय सिंह यांनी समाचार घेतला. पंतप्रधान म्हणतात ‘एक है तो सेफ है’. पंतप्रधानांच्या या नाऱ्याला लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी काहीजणांचे फोटो दाखवलेत. जे देशाच्या अर्थव्यवस्थेत अशी मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे दुसरे संपूनच जातील. याचाच अर्थ जो पर्यंत ते ‘एक आहेत तर सेफ आहेत’. यामुळे पंतप्रधान बरोबरच बोललेत, असा टोला दिग्विजय सिंह यांनी लगावला