२६ नोव्हेंबर पर्यंत योग शिबिर सुरू
परभणी (Manaswini) : दैनिक देशोन्नती मनस्विनी ग्रुपच्या वतीने २० नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधित मोफत योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ ते ७ या वेळेमध्ये हे शिबिर जागृती हनुमान मंदिर, जागृती कॉलनी वसमत रोड परभणी या ठिकाणी होत आहे. परिसरातील महिलांकडून या योग शिबिरास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दैनिक देशोन्नती मनस्विनी ग्रुप च्या (Manaswini) वतीने, याआधी १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान पहिले मोफत योगा शिबिर यशस्वीरित्या पार पडले. तसेच त्यानंतर २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीमध्ये दुसरे मोफत योगा शिबिर ही यशस्वीरित्या पार पडले. ही दोन्ही योगा शिबिर परभणीतील वेगवेगळ्या परिसरात घेण्यात आली होती. महिलांचा वाढता प्रतिसाद आणि महिलांच्या आरोग्याचा विचार करत दैनिक देशोन्नती मनस्विनीच्या तिसर्या मोफत योगा शिबिरास २० नोव्हेंबर रोजी सुरुवात केली आहे. या मोफत योगा शिबिरासाठी योग शिक्षिका सौ.वैशाली पोटेकर व सहशिक्षिका कु.मानसी बुजुर्गे महिलांना योग सेवा देत आहेत.
योग शिक्षिका सौ.वैशाली पोटेकर योगाविषयीची संपुर्ण माहिती व महत्व महिलांना सांगत आहेत. तसेच या (Manaswini) शिबिरासाठी सौ. मंगल मुदगलकर यांचे सहकार्य लाभले आहे. योगशिबिरास सौ.रेखा देशमुख, सौ.अनुराधा वायकोस, सौ.राजश्री समुद्रवार, सौ.दिपा नांदुरे, सौ.सुनंदा ढगे, या मनस्विनी सदस्या व परिसरातील इतर महिला वर्ग उपस्थित राहत आहेत. तरी जागृती मंगल कार्यालय परिसर तसेच आचार्य नगर, भाग्यलक्ष्मी नगर, स्नेह शारदा नगर, एकता कॉलनी, रामकृष्ण नगर व वसमत रोड परिसरात राहणार्या सर्व महिला या योगा शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन दैनिक देशोन्नती मनस्विनी संयोजिका मनिषा गोरे यांनी केले आहे.