“समाजाचा मोर्चा असल्यामुळे मी समाज म्हणून उद्या छत्रपती संभाजी नगर मध्ये निघणाऱ्या मोर्चाला उपस्थित राहणार आहे. बांधवांना ही माझी विनंती आहे की, सर्वांनी उद्या त्या मोर्चाला उपस्थित रहा. कारण एका लेकीन हाक दिलेली आहे की, माझ्या बापाला न्याय देण्यासाठी मला बळ द्या. पाठिंबा द्या. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या मुलीच्या हाकेला आपण पाठिंबा देऊन उद्या संभाजीनगरमध्ये उपस्थित रहा” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “सध्या जो तपास सुरू आहे. पोलीस, सीआयडी आणि एसआयटी असतील त्यामधली सगळी साखळी शोधणं खूप गरजेचं आहे. हे खूप मोठे रॅकेट आहे लहान रॅकेट नाही. खूप मोठ्या गुंडाच्या टोळीचं साम्राज्य उभं केलेलं आहे. त्यामुळे याच्या खोलामध्ये जाणं खूप गरजेचे आहे. कारण हे खूप मोठे कुख्यात गुंड आहेत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“कारण आतापर्यंत समोर येत नव्हतं किंवा लोक आणत नव्हती. कारण यांची खूप दहशत होती. परंतु आता लोकांच्या मनावर सुद्धा दडपण आणि दहशत गेल्यामुळे हे बाहेर यायला लागलं. त्यामुळे यांचं आता सगळं मुळा गाळा पर्यंत उकरून काढणं गरजेचं आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मागील वीस-पंचवीस वर्षापासून लोक खूप अन्याय सहन करत आहेत. त्यामुळे लोकांनी आता व्यक्त व्हायला पाहिजे. पुढे येऊन आपल्यावर झालेला अन्याय सांगायला पाहिजे. बीडच्या एसपींना सांगा, कलेक्टरांना सांगा” असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
‘खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच’
“त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी एकच विनंती आहे की, यामधला एकही आरोपी सुटता कामा नये. कारण हे खूप मोठं षडयंत्र आहे. ही खूप मोठी टोळी आहे आणि ही सगळी संपली पाहिजे. कारण खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “नाहीतर नंतर लोक या विरोधात उग्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये येणार आहेत. “कारण ज्यांनी खून केला आणि ज्यांनी खंडणी मागितली. मागायला लावणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. त्याला मधी घेणं गरजेचं आहे. ज्यांनी खंडणी वसूल करण्यासाठी लोक पाठवले आणि खून करण्यासाठी लोकं पाठवले. खून करणाऱ्या पेक्षा आणि खंडणी मागणाऱ्या पेक्षा हा जो काही सामूहिक गट घडून आणला हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. त्यामुळे खंडणी मधला सुद्धा एकही आरोपी सुटता कामा नये” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.